1 / 7रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक. रोहित शेट्टीने सिंघम, गोलमाल, बोल बच्चन, सिंबा, सूर्यवंशी अशा सुपरहिट सिनेमांंचं दिग्दर्शन केलं आहे. रोहित काही वर्षांपूर्वी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या अफेअर प्रकरणामुळे चर्चेत आला होता.2 / 7रोहित शेट्टी एका ३६ वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात होता. रोहित या अभिनेत्रीच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला होता की, तो त्याच्या पत्नी आणि मुलाला सोडायलाही तयार होता. ही अभिनेत्री होती प्राची देसाई.3 / 7काही वर्षांपूर्वी रोहित आणि प्राची रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं गेलं. दोघं एकमेकांना डेटही करत असल्याच्या चर्चा होता. २०१२ साली रिलीज झालेल्या बोल बच्चन सिनेमाच्या सेटवर त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.4 / 7रोहित आणि प्राची या सिनेमासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करत होते. सिनेमा सुपरहिट झाला आणि प्राची रोहितसाठी लकी ठरली. त्यानंतर रोहित आणि प्राचीचं मैत्रीचं नातं आणखी पुढे गेलं5 / 7मीडिया रिपोर्टनुसार, रोहित प्राचीच्या प्रेमात इतका बुडाला होता की तो पत्नीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेणार होता. इतकंच नव्हे मुलाकडे सुद्धा रोहित शेट्टीचं अजिबात लक्ष नव्हतं.6 / 7परंतु काहीकाळ प्राचीसोबत राहिल्यानंतर रोहितला त्याची चूक उमगली. तो प्राचीला सोडून पुन्हा पत्नीसोबत राहायला गेला. यानंतर रोहित-प्राचीने कधीही एकमेकांसोबत काम केलं नाही.7 / 7रोहित-प्राचीने कधीही त्यांच्या रिलेशनशीपचा जाहीर खुलासा केला नाही. याशिवाय ब्रेकअप झाल्यावर एकमेकांची बदनामीही केली नाही. त्यांनी कायम त्यांचं नातं सीक्रेट ठेवलं