Join us
Daily Top 2Weekly Top 5

रॉक ऑन मधील या कलाकाराला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:23 IST

1 / 7
रॉक ऑन २ मध्ये झळकलेल्या पुरब कोहली आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 7
पुरबसोबतच त्याच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्याने इंस्टाग्रामवर दिली आहे. पुरब आणि त्याचे कुटुंबीय सध्या लंडनमध्ये राहत आहेत.
3 / 7
पूरब कोहलीने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तसेच त्याने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
4 / 7
पुरबची हिप हिप हिर्रे ही मालिका नव्वदीच्या दशकात चांगलीच गाजली होती. त्याने वास्तू शास्त्र, माय ब्रदर निखिल आवारापन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
5 / 7
पूरब इट्स नॉट दॅट सिम्पल, टाइपरायटर यांसारख्या वेबसिरिजमध्ये देखील झळकला आहे.
6 / 7
पुरब कोहलीने नुकतीच इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे की, आमच्यात नेहमीच्या तापाची व सर्दीची लक्षणे दिसली. श्वसनाचा त्रास जाणवला. डॉक्टरांनी आम्हाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. माझी मुलगी इनाया हिला पहिल्यांदा करोनाची लागण झाली. त्यानंतर पत्नी लुसी व मला ताप आला. चार-पाच दिवसांनी ताप कमी झाला पण सर्दी अजूनही तशीच होती. आम्ही सगळे क्वारंटाइनमध्ये होतो. बुधवारी आम्ही क्वारंटाइनमधून बाहेर आलो.
7 / 7
कोरोनापासून वाचण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी घरीच काही काळजी घेतली. त्याबद्दलही त्याने इन्स्टाग्रामद्वारे सांगितले आहे की, आम्ही दिवसातून चार ते पाच वेळा वाफ घ्यायचो. मिठाच्या पाण्याने गुळण्या करायचो. आलं, हळद आणि मध यांचं मिश्रण करून घेतल्याने घसा खवखवणं कमी झालं. गरम पाण्याने आंघोळ करत होतो. याशिवाय दिवसभर आराम करत होतो. आता दोन आठवडे झाले आहेत. मात्र अजूनही आम्ही त्यातून ठीक होत आहोत असं वाटते आहे.
टॅग्स :बॉलिवूड