Join us  

PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:09 PM

1 / 9
रिचा चड्ढा व अली फजल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दिल्लीत दोघांचं थाटात लग्न झालं. आता लग्नाच्या काही दिवसानंतर रिचाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 9
या फोटोत रिचा कमालीची सुंदर दिसतेय. हातावर सजलेली अलीच्या नावाची मेहंदी ती फ्लॉन्ट करताना दिसतेय.
3 / 9
मेहंदी सोहळ्यासाठी रिचाने ग्रीन कलरचा लहंगा निवडला होता. त्यावर स्टायलिश पोनी आणि हेवी ज्वेलरी असा तिचा लुक होता.
4 / 9
मेहंदी सेलिब्रेशनदरम्यान रिचा अलीसोबत नॉटी पोझ देताना दिसली. दोघंही एकमेकांत हरवलेले दिसले.
5 / 9
रिचाच्या मेहंदीसाठी राजस्थानातून पाच आर्टिस्ट बोलवले होते. रिचाच्या हातावर काढण्यात आलेल्या मेहंदीमध्ये अलीचं नाव होतं. तिच्या दोन लाडक्या मांजरींचे स्केच होतं.
6 / 9
रिचा आणि अली हे दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली.
7 / 9
अखेर 6 ऑक्टोबरला रिचा व अलीचं लग्न पार पडलं. 2 ऑक्टोबरपासून लग्नविधी सुरू झाले आणि 6 तारखेला दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.
8 / 9
2012 मध्ये फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिली भेट झाली होती.
9 / 9
सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2019 मध्ये रिचा-अलीने साखरपुडा केला. फुकरे याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही रिचा व अली एकत्र झळकणार आहेत.
टॅग्स :रिचा चड्डाअली फजलबॉलिवूड