Join us  

अधुरी एक कहाणी! अन् धर्मेंद्रचा जावई होता होता राहिला रणवीर सिंग, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 12:56 PM

1 / 8
बॉलिवूडचा एनर्जिटिक अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) त्याच्या लेडी लव्ह दीपिका पदुकोणसह संसारात रमला आहे. कालच त्याने 38 वा वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर रणवीरचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं.
2 / 8
पण तुम्हाला माहितीए का कॉलेजच्या दिवसात रणवीरची क्रश कोणीतरी वेगळीच होती. त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. दोघंही ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर तिने एका अभिनेत्यासाठीच रणवीरला सोडलं होतं.
3 / 8
रणवीरची कॉलेजमधली क्रश चक्क धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक आहाना देओल (Ahana Deol) होती. रणवीर आहानावर जीव ओवाळून टाकायचा. तेव्हा रणवीर काही लोकप्रिय नाही तर कॉलेजमधला इतर मुलांसारखाच साधा सरळ मुलगा होता. फिल्मी दुनियापासून तो खूप दूर होता.
4 / 8
आहाना देओल धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची छोटी मुलगी आहे. आहाना सुरुवातीपासूनच लाईमलाईटपासून दूर राहिली. पण तिचं आणि रणवीरचं अफेअर होतं हे नंतर रणवीरने एका मुलाखतीत सांगितलं.
5 / 8
नंतर आहानाने रणवीरसोबत नातं तोडलं. ती आठवण त्याने करण जोहरच्या 'कॉफी विद करण'शो मध्ये सांगितली होती. आहानाने कोणा दुसऱ्यासाठीच त्यांचं लॉंग टर्म रिलेशनशिप तोडलं होतं.
6 / 8
आपल्या हरवलेल्या प्रेमाविषयी बोलताना रणवीर म्हणाला होता की,'मी तिच्यासाठी खूप वेडा होतो. आमचं ४ ते ५ वर्षांचं रिलेशन होतं. नंतर तिने दुसऱ्या मुलासाठी रिलेशनशिप तोडलं. तो मुलगा म्हणजे आदित्य रॉय कपूर'
7 / 8
आहानाने कधीच फिल्मी दुनियेत एंट्री केली नाही. काही वर्षांनी तिने वैभव वोहरासोबत लग्न केलं. तर रणवीर दीपिकासोबत लग्नबंधनात अडकला. मात्र आजही रणवीर सिंह आणि आदित्य रॉय कपूर दोघंही आहानाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. बॉलिवूडमधील हे दोघंच स्टार तिचे फॉलोअर्स आहेत.
8 / 8
आहानाला एक मुलगाही आहे. पती आणि मुलांसोबत ती अनेकदा फोटो पोस्ट करत असते. तिचे पती वैभव वोहरा व्यावसायिक आहेत.
टॅग्स :रणवीर सिंगधमेंद्रहेमा मालिनीरिलेशनशिप