करोडोंची मालकीण आहे रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा, काही वर्षांपूर्वी तिच्यावरही लागला होता चोरीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 11:49 IST
1 / 10घरात सगळे अभिनते, अभिनेत्री असताना रिद्धिमानं आपली वेगळी वाट निवडलीय. अभिनयक्षेत्रात करिअर करण्यापेक्षा तिने इंटिरियर आणि फॅशन डिझायनर बनण्याचा निर्णय घेतला. 2 / 10ज्वेलरी डिझाइनम करणे तिला पसंत असून तेच काम ती करते. रिद्धीमा बॉलिवूड पार्ट्यां किंवा इव्हेंटसमध्ये आपल्या कुटुंबासह हजेरी लावताना दिसते. फार कमी लोकांना मीहिती आहे की, रिद्धीमावरही काही वर्षांपूर्वी चोरीचा आरोप लावण्यात आला होता.3 / 10बॉलिवूड इंडस्ट्रीत डिझायनींग क्षेत्रात तिचं नाव नेहमी चर्चेत असतं. रिद्धीमानं फेस्टिवल ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं होतं. या कलेक्शनमध्ये मोती आणि हिऱ्यांचा वापर करून डिझायन केलेल्या कानातल्यांच्या एका सेटचा समावेश होता. या कानातल्यांच्या सेटचा फोटो रिद्धिमानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्यानंतर हे डिझायन चोरीचं असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता.4 / 10डाइट सब्या नावाच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून दोन फोटोज शेअर करत रिद्धीमाचे डिझाईन तिचे नसून चोरीचे आरोप करण्यात आला होता. ते डिझाइन कोकीची मिकीमोटो यांचे असल्याचे सांगण्यात आले होते. रिद्धिमानं डिझाइनच नाही तर फोटोही चोरल्याचा गंभीर त्याने तिच्यावर लावला होता.5 / 10नुकताच रिद्धीमाने तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवसनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते.6 / 10 रिद्धीमाचे लग्न पति भरत साहनीसह झाले असून ती दिल्लीत राहते. रिद्धीमा आणि भरतला एक मुलगी आहे. समारा असे मुलीचे नाव आहे.7 / 10रिद्धीमाही सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करते. 8 / 10 रिद्धीमाही आपल्या आईप्रमाणेच दिसायला सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर नेहमीच रिद्धीमाचे कुटुंबासह फोटो पाहायला मिळतात.9 / 10रिद्धीमाही मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळते.10 / 10बॉलिवूड अभिनेत्रींनाही सौंदर्याच्याबाबतीत टक्कर देईल इतकी ती सुंदर दिसते.