Ranbir Kapoor : आलियासोबत लेबर रूममध्ये कसा होता रणबीर कपूरचा अनुभव?; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:38 IST
1 / 11रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या रणबीर त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'तू झूठी मैं मक्कार' च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत दिसला आहे. त्याच वेळी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 12 दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 2 / 11रणबीरने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियासोबतच्या त्याच्या लेबर रूमच्या अनुभवाबद्दल सांगितले. रणबीर कपूर त्याची चुलत बहीण करीना कपूरच्या शो 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये पोहोचला होता. यादरम्यान अभिनेत्याने स्वतःला वडील म्हणून रेट केले.3 / 11रणबीरने त्याच्या लेबर रूमच्या अनुभवाबद्दल देखील सांगितले आणि तो 'खूप चांगला' अनुभव असल्याचे सांगितले. यासोबतच राहाच्या जन्मावेळी तो आठवडाभर रुग्णालयातच होता, अशी माहितीही समोर आली आहे. आलियाने आपल्या मुलीला मिठी मारली तेव्हा त्याने त्याला 'मॅजिकल' क्षण म्हटलं आहे. 4 / 11स्वत:ला वडील म्हणून रेटिंग देण्याच्या प्रश्नावर रणबीर म्हणाला की, मला स्वत:ला 7 रेटिंग द्यायला आवडेल. रात्री झोप मोड होते कारण तुम्हाला तुमच्या पहिल्या मुलाचा उत्साह असतो आणि ती आपल्यामध्ये बेडवर झोपलेली असते, तेव्हा तुम्ही तिच्या अगदी हलक्या हालचालींनी सावध होता.5 / 11कोलकाता येथे एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान रणबीरने खुलासा केला की तो आपल्या मुलीला खूप मिस करतो आणि तिचे फोटो पाहत राहतो. अभिनेता म्हणाला होता, 'मला घर सोडायचं नव्हतं. आज सकाळी, माझ्या फ्लाइटच्या आधी फक्त 20 मिनिटे ती माझ्यासोबत होती आणि त्यामुळे मी फ्रेश झालो.'6 / 11'मला तिची खूप आठवण येते, मी तिचे फोटो बघत राहतो. मी बर्पिंग स्पेशालिस्ट आहे.' ढेकर येणे हा इतका मोठा भाग आहे हे मला कधीच माहीत नव्हते. जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी नेहमी तिच्याबरोबर असतो आणि ते मॅजिकल क्षण असतात.'7 / 11वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर लवकरच रश्मिका मंदानासोबत एनिमलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वांगा यांनी केले असून तो यावर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीरचे अनेक आगामी प्रोजेक्ट देखील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 11आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी मुलीचे नाव राहा असं ठेवले आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या बाळाच्या नावाची पोस्ट शेअर केली होती. आलियाने सांगितले होते की, तिच्या मुलीचे हे गोंडस नाव तिच्या आजीने म्हणजेच नीतू कपूरने ठेवले आहे. 9 / 11आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी मुलीचे नाव राहा असं ठेवले आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या बाळाच्या नावाची पोस्ट शेअर केली होती. आलियाने सांगितले होते की, तिच्या मुलीचे हे गोंडस नाव तिच्या आजीने म्हणजेच नीतू कपूरने ठेवले आहे. 10 / 1111 / 11