Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : रणबीर कपूर लवकरच होणार भट्ट परिवाराचा दुसरा जावई, कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:54 IST

1 / 8
बॉलिवूडचे लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. १३ ते १५ एप्रिल दरम्यान दोघांचं लग्न होणार असल्याचं बोललं जात आहे. अशात त्यांच्या लग्नाविषयी वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत.
2 / 8
आलिया भट्टसोबत लग्न केल्यावर रणबीर कपूर भट्ट परिवाराचा जावई होणार आहे. रणबीर हा भट्ट परिवारातील दुसरा जावई असेल. अनेकांना भट्ट परिवाराच्या पहिल्या जावयाबाबत काहीच माहीत नाही. आम्ही सांगतोय आलियाची मोठी बहीण पूजा भट्टचा एक्स पती मनीष मखीजाबाबत.
3 / 8
एकेकाळी पूजा भट्टचं नाव रणवीर शौरी, बॉबी देओल, फरदीन खान यांच्यासोबत जोडलं जात होतं. पण तिला तिचं पहिलं प्रेम मनीष मखीजाच्या रूपाने मिळालं होतं. हे नातं तेवढं विस्कळीत नव्हतं, जेवढी पूजाची नंतरची नाती होती.
4 / 8
मनीष मखीजा एक व्हिडीओ जॉकी आणि रेस्टॉरन्टचा मालक आहे. त्यासोबतच तो अभिनयही करत होता. मनीषला चॅनल व्ही च्या द उधम सिंह शोसाठी ओळखलं जातं. तसेच त्याचा कॅश कॅब मीटर चालू शो सुद्धा फेमस होता. मखीजाने दिल्लीत शिक्षण घेतलं.
5 / 8
पूजा भट्ट आणि मनीष मखीजाची पहिली भेट २००३ मध्ये 'पाप' सिनेमाच्या शूटिंगवेळी झाली होती. या सिनेमात मनीषने एक छोटीशी भूमिका केली होती. तेव्हापासून दोघांनी एकमेकांना पसंत के होतं आणि दोन महिन्यांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केलं होतं. पण हे नातं नेहमीसाठी नव्हतं. दोघे ११ वर्ष सोबत राहिले आणि २०१४ मध्ये वेगळे झाले.
6 / 8
पूजा भट्ट मनीषला मुन्ना नावाने हाक मारत होती. वेगळे झाल्यावरही दोघांनी कधी घटस्फोट घेतला नाही. पूजाने मनीषपासून वेगळे होण्यावर वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली होती की, 'मी माझ्या मर्जीने जगणं निवडलं आहे. सर्टिफिकेट लग्ने जुळतात आणि मोडतात. ज्या लोकांना आमची काळजी आहे आणि खासकरून ज्यांना नाहीये त्यांना सांगते की मी आणि मुन्ना ११ वर्षांनंतर वेगळे झालो. आम्ही सहमतीने हा निर्णय घेतला'.
7 / 8
पूजा भट्टआधी मनीषने नेहा गुप्ता नावाच्या महिलेसोबत लग्न केलं होतं. असं सांगितलं जातं की, दोघांना एक मुलगाही आहे. मनीष पूजापासून वेगळा झाल्यावर आपल्या मुलाला वेळ देत आहे. त्याच्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाला आहे. पूजा आणि मनीषला कोणतंही अपत्य नाही.
8 / 8
मनीष मखीजा अखेरचा 'लव्ह शव ते चिकन खुराणा' सिनेमात दिसला होता. यात त्याने लोकल माफियाची भूमिका साकारली होती. यानंतर मनी पडद्यावर दिसला नाही. आता तो काय करतो याची काही माहिती उपलब्ध नाही.
टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठपूजा भटलग्नआलिया भटरणबीर कपूर