By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:05 IST
1 / 10उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकाने हॉलिवूडमध्येही तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा प्रियंका चोप्राने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)2 / 10अमेरिकन गायक निक जोनाससोबत प्रियांकाने लग्न केल्यापासून ती न्युयॉर्कमध्येच स्थायिक झाली आहे. मात्र ग्लोबल स्टार होण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. खूप मेहनत घ्यावी लागली. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)3 / 10प्रियंका चोप्रा इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिने तेव्हा पदार्पण केले नव्हते. त्यावेळी ती असीम मर्चंटला डेट करत होती. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)4 / 10प्रियंका चोप्रा इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिने तेव्हा पदार्पण केले नव्हते. त्यावेळी ती असीम मर्चंटला डेट करत होती. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)5 / 10प्रियंका आणि असीमच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते की 2002 मध्ये अशी घटना घडली ज्यामुळे देसी गर्लला धक्का बसला होता. एवढेच नाही तर तिनं आत्महत्येचा प्रयत्नही केला. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)6 / 102016 मध्ये प्रियांका चोप्राचे मॅनेजर प्रकाश जाजू यांनी सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. 2002 मध्ये असीम मर्चंटच्या आईचं निधन झालं होतं. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)7 / 10प्रियंका असीमच्या आईच्या खूप जवळ होती आणि तिला हे सहन होत नव्हते. रिपोर्टनुसार, त्यावेळी अभिनेत्रीने एका अपार्टमेंटच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)8 / 10त्यानंतर प्रकाश जाजू यांनी ट्विट केले होते ज्यात लिहिले होते की, आज प्रियंका कितीही खंबीर असली तरी एक वेळ अशी आली की तिने २-३ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि मी तिला समजावले होते. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)9 / 10प्रियांका चोप्राचे आणि प्रकाश जाजूचे संबंध फारसे चांगले नव्हते, अशी माहिती आहे. 2004 मध्ये प्रियांकाने प्रकासचा करार रद्द केला तेव्हा दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)10 / 10त्यावेळी मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकाश जाजू यांनी मुंबई कोर्टात प्रियांकाच्या विरोधात केसही दाखल केली होती. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)