पुढे प्रियंकाने लिहिले की, ‘यूएन ग्लोबल गोल्स अवॉडर््समध्ये गर्ल इम्पॉवरमेंटवर बोलणे माझ्यासाठी सन्मानजनक होते. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन मुलींसाठी इम्पॉवर, एज्युकेट आणि त्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जर शक्य होत असेल तर आपल्याला अशा एका सामाजाची निर्मिती करायची आहे, ज्याठिकाणी लोकांना त्यांचे हसत-हसत स्वप्न पूर्ण करता यावे.
सर्वात तरुण सद्भावनादूत असलेली मुजून अलमेल्लेहान सीरियातील शरणार्थी आणि शिक्षण प्रसार कार्यकर्ती आहे. मुजूनने म्हटले होते की, ‘शरणार्थी असताना मी बघितले की, मुलींना लहान वयातच विवाहाच्या बंधनात बांधले जात आहे. तसेच त्यांना बालकामगार बनविले जात आहे. यूनिसेफबरोबर काम करताना मी अशा मुलांना शाळेत दाखल करून त्यांची मदत करू इच्छिते.
याचवर्षी झालेल्या ६९ व्या एॅमी अवॉडर््समध्ये ग्लोबल स्टार प्रियंका चोपडाने अनेकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित केले होते. तिच्या ड्रेसमुळे ती त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी तिचे लोकांनी खूप कौतुकही केले होते. बºयाचशा लोकांना असे वाटत असते की, बेस्ट ड्रेस परिधान करणे सोपे काम नाही. प्रियंकाचा गाऊन बघून तर ही बाब निश्चित झाली होती. असो, सध्या प्रियंका हॉलिवूडमध्ये काही प्रोजेक्टवर काम करीत असून, लवकरच ती बॉलिवूडमधील काही चित्रपट साइन करणार आहे.