Join us

स्टारकिड्स नाही, हे आऊटसाइडर्स करणार बॉलिवूडमध्ये धमाका, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 02:30 IST

1 / 8
मानुषी छिल्लर कोण तर 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी सौंदर्यवती. ही मानुषी लवकरच अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. मानुषी यामध्ये राणी संयोगिताची भूमिका साकारणार आहे.
2 / 8
‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री शालिनी पांडेचा चेहरा तुम्हाला आठवत असेलच. हीच शालिनी पांडे आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. यश राज फिल्म्सच्या रणवीर सिंग स्टारर जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात तिची वर्णी लागली आहे.
3 / 8
कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी’ या ओटीटीवर गाजलेल्या वेबसीरिजमध्ये दिसलेली श्रावणी वाघ हिचाही बॉलिवूडमध्ये धमाकेदार डेब्यू होणार आहे. यशराज फिल्म्सच्या ‘बंटी और बबली 2’ मधून ही बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
4 / 8
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा म्हणजे, लक्ष्य लालवाणी. लक्ष्य लालवाणी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘दोस्ताना 2’ या या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटात तो झळकणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर लीड रोलमध्ये आहेत.
5 / 8
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा शंतनू महेश्वरी हा अभिनेता आणि डान्सर म्हणून ओळखला जातो. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून तो धमाकेदार एन्ट्री करणार आहे. आलिया भट मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गंगुबाई काठडीयावाडी’ या चित्रपटात तो झळकणार आहे.
6 / 8
प्रसिद्ध युट्युबर कॅरी मिनाटीसुद्धा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. जय देवगणच्या ‘मे-डे’ या चित्रपटातून त्याची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री होतेय. या सिनेमात यात अमिताभ बच्चन सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
7 / 8
शर्ली सेटिया ही तशी गायिका. पण आता ती अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘मस्का’ चित्रपटात ती दिसली होती. आता तिला मोठा ब्रेक मिळाला आहे. साबीर खान यांच्या ‘निकम्मा’ या चित्रपटात तिची वर्णी लागली आहे.
8 / 8
‘मिसमॅच्ड’ या ओटीटी वरील वेबसीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळी ही सुद्धा येत्या काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धर्मा प्रॉडक्शन च्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यात तिच्यासोबत वरुण धवन, किआरा अडवाणी, अनिल कपूर, नीतू सिंग अशी तगडी कलाकार मंडळी असणार आहे.
टॅग्स :बॉलिवूड