By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:01 IST
1 / 9Oscars Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. 2 / 9यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकली. 3 / 9पण, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते ईशा अंबानी यांनी. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांनीही ग्रँड एन्ट्री घेतली.4 / 9रेड कार्पेटवर ईशा अंबानींचा स्वॅग पाहून हॉलिवूड स्टार्सही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं. 5 / 9पती आनंद पिरमल यांच्यासह ईशा अंबानी पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. 6 / 9ईशा अंबानींनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. स्ट्रेपलेस डिझायनर गाऊन त्यांनी परिधान केला होता. 7 / 9गळ्यात चोकर आणि मोठे कानातले अशी फॅशन ईशा अंबानींनी केल्याचं दिसून आलं. 8 / 9केस मोकळे सोडल्याने त्यांच्या लूकला चार चांद लागले होते. ईशा अंबानींवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. 9 / 9ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ईशा अंबानींचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत.