- राय लक्ष्मीचा जन्म ५ मे १९८९ मध्ये कर्नाटक (बेंगळुरू) येथे झाला. राय लक्ष्मी एक मॉडेल असण्याबरोबरच अभिनेत्रीदेखील आहे. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
- राय लक्ष्मीने वयाच्या पंधराव्या वर्षी अभिनयास सुरुवात केली. २००५ मध्ये आलेल्या ‘कारका कसादरा’ या तेलगू चित्रपटातून तिने डेब्यू केला. त्यानंतर तिने बºयाचशा तामिळ चित्रपटांमध्ये काम केले.
- पुढे २००७ मध्ये तिने मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली. त्यामुळे तिला एकापाठोपाठ एक चित्रपटांच्या आॅफर्स मिळत गेल्या.
- बॉलिवूडमध्ये राय लक्ष्मीचा ‘जुली-२’ हा डेब्यू चित्रपट नाही. कारण याअगोदर ती सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकीरा’ या चित्रपटात कॅमिओ करताना बघावयास मिळाली. राय लक्ष्मीने चित्रपटात माया नावाची सपोर्टिंग भूमिका साकारली.
- तब्बल १४ तामिळ चित्रपट केल्यानंतर राय लक्ष्मीला ‘धामधूम’ या तामिळ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
- राय लक्ष्मी एक मॉडेल आणि अभिनेत्री असण्याबरोबरच एक चांगली डान्सरही आहे. ती साउथ इंडस्ट्रीमध्ये तिच्या डान्समुळे चांगलीच प्रसिद्ध आहे.
- ‘जुली-२’ या चित्रपटाविषयी बोलताना राय लक्ष्मीने म्हटले होते की, ‘मी या चित्रपटात तब्बल ९८ वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटासाठी मी तब्बल १० ते ११ किलो वजन कमी केले होते अन् पुन्हा वाढविलेही होते.