Join us

IN PICS : भारतात हिट मात्र विदेशात ‘बॅन’ झालेत बॉलिवूडचे हे सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 14:55 IST

1 / 9
तेरे बिन लादेन - अल-कायदाचा म्होरक्या व अतिरेकी ओसामा बिन लादेन याच्यावर आधारित ‘तेरे बिन लादेन’ हा कॉमेडी सिनेमा भारतातील प्रेक्षकांना फार आवडला होता. पण पाकिस्तानात या सिनेमावर बॅन लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता अली जफरने मुख्य भूमिका साकारली होती.
2 / 9
बॉम्बे - 1995 साली प्रदर्शित ‘बॉम्बे’ हा चित्रपट मुंबईतील जातीय दंगलींवर आधारित होता. या सिनेमाला भारतातही विरोध झाला. याऊपर हा सिनेमा भारतात रिलीज झाला. सिंगापूरमध्ये मात्र या सिनेमावर बंदी लादण्यात आली होती.
3 / 9
पॅडमॅन- अक्षय कुमार स्टारर ‘पॅडमॅन’ या सिनेमाला भारतात राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने मात्र या सिनेमावर आक्षेप घेत, त्याच्या रिलीजवर बंदी लादली होती.
4 / 9
ओह माय गॉड - अक्षय कुमार, परेश रावल, मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘ओह माय गॉड’ या सिनेमाला भारतातही विरोध झाला. मात्र हा सिनेमा खूप गाजला. मात्र या वादांमुळे अनेक देशांनी या सिनेमावर बॅन लादला होता.
5 / 9
द डर्टी पिक्चर - सिल्म स्मिताच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या सिनेमात विद्या बालन लीड भूमिकेत होती. या सिनेमासाठी तिने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला होता. या सिनेमात अनेक बोल्ड सीन्स होते. यामुळे कुवैतमध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आला होता.
6 / 9
देली बेली- 2011 साली रिलीज ‘देली बेली’ हा सिनेमा लोकांना आवडला. विशेषत: तरूणाईने हा सिनेमा डोक्यावर घेतला होता. सिनेमात शिव्या असल्याने या सिनेमाला अ‍ॅडल्ट सर्टिफिकेट मिळाले होते. नेपाळने हा सिनेमा बॅन केला होता.
7 / 9
रांझणा - सोनम कपूर आणि धनुषचा ‘रांझणा’ हा सिनेमा भारतात हिट झाला. पण पाकिस्तानला यावर आक्षेप होता. सिनेमात सोनमने मुस्लिम मुलीची भूमिका साकारली होती. मुस्लिम असताना ती दोन हिंदू मुलांच्या प्रेमात पडते, या सिनेमाच्या कथेवर पाकचा आक्षेप होता.
8 / 9
उडता पंजाब - या सिनेमावरून भारतातही चांगलाच राडा झाला होता. ड्रग्ज, चित्रपटातील शिव्यांचा वापर यामुळे हा सिनेमा पाकिस्तानात बॅन करण्यात आला होता.
9 / 9
एक था टायगर - सलमान खानचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. पण हा सिनेमा पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाला खटकला आणि त्यांनी आपल्या देशात तो बॅन केला.
टॅग्स :बॉलिवूड