1 / 7अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते. 2 / 7इन्स्टाग्रामवर निक्की तांबोळीचे ३.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिथे ती दररोज तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. फॅन्ससुद्धा तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि शेअरचा पाऊस पाडत असतात. 3 / 7निक्की तांबोळीने आपल्या जबरदस्त स्टाइल सेन्सने ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीची फॅशन क्विन आहे हे दाखवून दिले आहे. निक्की इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही आऊटफिट्समध्ये सुंदर दिसते. 4 / 7निक्कीचे फॅन्स सतत इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या फोटोंवर कमेंट्स करत असतात. कुठल्याही इव्हेंट किंवा फंक्शनमध्ये निक्की तिच्या चार्मिंग लूक आणि स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते.5 / 7निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात ही दक्षिणेतील हॉरर चित्रपट कंचना ३ मधून केली होती. हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला होता. 6 / 7कंचना ३ शिवाय निक्कीने काही अन्य तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्याशिवाय खतरों के खिलाडी ११ मध्येही ती स्पर्धक म्हणून दिसली आहे. 7 / 7तसेच टीव्ही शो खतरा खतरामध्येही निक्की तांबोळी गेस्ट म्हणून दिसली होती. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट बघता बघता व्हायरल होत असतात.