1 / 8नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. आज नवाजुद्दीन त्याचा ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 / 8अभिनयासोबतच नवाजुद्दीन त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. न्यूयॉर्कमध्ये असताना वन नाईट स्टँड केल्याचा धक्कादायक खुलासा नवाजुद्दीनने केला होता. 3 / 8एका पुस्तकात नवाजुद्दीनने म्हटलं होतं की २००६ ते २०१० या वर्षांत अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. हिट सिनेमांमुळे लोक त्याला ओळखू लागले होते. 4 / 8त्याच दरम्यान नवाजुद्दीन त्याच्या मित्रासोबत न्यूयॉर्कला गेला होता. तिथल्या एका कॅफेमध्ये एक महिला वेटर त्याला भेटली. 5 / 8नवाजुद्दीनने सांगितलं की ती महिला वेटर त्याच्याकडे टक लावून पाहत होती. थोड्यावेळाने तिने नवाजुद्दीनला विचारलं की तो अभिनेता आहे का? 6 / 8त्यानंतर अभिनेत्याने तिला कोणता सिनेमा पाहिलास? असं विचारल्यावर तिने लंचबॉक्स चित्रपटाचं नाव घेतलं होतं. 7 / 8त्यानंतर खूप वेळ ते दोघे गप्पा मारत होते. तेव्हा नवाजुद्दीनचं लग्न झालं होतं. असं असूनही त्या महिला वेटरसोबत वन नाईट स्टँडची कबुली नवाजुद्दीनने दिली होती. 8 / 8जे न्यूयॉर्कमध्ये झालं ते तिथेच राहिलं, असंही नवाजुद्दीन म्हणाला होता.