अमिताभची नात नव्या नवेलीचा फोटो अन् मिजानची कमेंट, पुन्हा सुरु झाली अफेअरची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 17:50 IST
1 / 10अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा काही वर्षांपूर्वी एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती. नव्या नवेली तर बिनधास्त होती. पण तिच्यासोबत असलेला मिस्ट्री बॉय मात्र मीडियाच्या कॅमे-यांसमोर आपला चेहरा लपवतांना दिसला होता.2 / 10 चक्क स्वत:च्या टी-शर्टने चेहरा लपवतानाचे त्याचे नव्यासोबतचे फोटो व्हायरल झाले होते. पण चेहरा लपवलेला नव्याचा हा मित्र कोण? हे मात्र उघड झाले नव्हते.3 / 10पण शेवटी मीडियापासून लपवता लपत नाही. नव्यासोबतचा मीडियाला पाहून चेहरा लपवणारा तो मिस्ट्री बॉय दुसरा कुणी नसून अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान होता. 4 / 10आता मिजान व नव्या पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण काय तर नव्याच्या फोटोवर मिजानची कमेंट. नव्याने नुकतेच तिचे इन्स्टा अकाऊंट पब्लिक केले. यानंतर नव्याने छतावरचा एक फोटो शेअर केला आणि तो शेअर करताच मिजानची कमेंट आली.5 / 10नव्याने इन्स्टाग्रामवर घरांच्या कौलावर बसलेला एक फोटो शेअर केला आहे. पण यात तिचा चेहरा केसांनी झाकलेला दिसतोय. यावर कमेंट करत, तू तुझा चेहरा दाखवू शकतेस का? अशी कमेंट मिजानने केली आहे. या कमेंटसोबत त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.6 / 10यानंतर या दोघांमध्ये काय खिचडी शिजतेय? असा सवाल चाहत्यांनी केला आहे.7 / 10मिजान हा जावेद जाफरीचा मुलगा आहे. अलीकडे ‘मलाल’ या सिनेमातून त्याने डेब्यू केला होता.8 / 10 सोशल मीडियावर नव्या बरीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या मित्रांसोबत अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नव्याने अलीकडे आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. फनलव्हिंग नव्याला पार्टी करणे अतिशय आवडते. 9 / 10नव्या नवेली ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताची मोठी मुलगी आहे.10 / 10नव्याने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट लोकांसाठी ओपन केले असून तिचे फोटो आता सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहेत.