By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:42 IST
1 / 10भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची माजी पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच आपल्या बोल्ड स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. 2 / 10अलीकडेच नताशाने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पूलमधील तिचा हा 'किलर लूक' पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत.3 / 10नताशाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय स्टायलिश अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट असलेल्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. 4 / 10जांभळा, नारंगी आणि काळा अशा रंगांची ही मोनोकिनी तिच्यावर खूपच खुलून दिसत आहे. 5 / 10विशेष म्हणजे, तिने आपल्या कुरळ्या केसांमध्ये एक लहान गुलाबी फूल माळले आहे, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.6 / 10पूलच्या रेलिंगवर फळांची प्लेट आणि आजूबाजूला हिरवळ दिसून येतंय. तिचा हा 'नो-फिल्टर' आणि रिलॅक्स लूक चाहत्यांच्या पसंतीस पडलाय.7 / 10नताशा आणि हार्दिक पांड्या ३१ मे २०२० रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांना 'ऑगस्त्य' नावाचा मुलगा आहे. 8 / 10अखेर जुलै २०२४ मध्ये या दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याची अधिकृत घोषणा केली.9 / 10 घटस्फोटानंतर नताशा आपल्या मुलावर आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. ती अनेकदा चाहत्यांसाठी मुलासोबतचे फोटो शेअर करते.10 / 10हार्दिकशी लग्न केल्यानंतर नताशा इंटस्ट्रीपासून दूर गेली होती. पण, घटस्फोटानंतर नताशाने पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे.