1 / 8बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या संसारात वादळ आलं आहे. मौनी तिचा पती सूरज नांबियारपासून वेगळी झाली असून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. 2 / 8लग्नानंतर ४ वर्षांतच मौनी आणि सूरज एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सूरजने मौनीला फसवल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 3 / 8मौनी आणि सूरजच्या घटस्फोटासाठी चाहत्यांनी मौनीची बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला जबाबदार धरलं आहे. 4 / 8मौनीच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच दिशा पटानीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 5 / 8या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत दिशा पटानीमुळेच मौनीचा संसार मोडल्याचं म्हटलं आहे. 6 / 8'मौनीचा घटस्फोट केलास', 'मौनीचा संसार मोडून कसं वाटतंय?', 'तुझ्यासोबत राहिल्यामुळेच मौनीने घटस्फोट घेतला', अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 7 / 8'तुझ्यामुळेच मौनी आणि सूरजमध्ये भांडण झालं', अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे. 8 / 8मौनी आणि सूरज यांच्यासोबत अनेकदा दिशा पटानीही दिसायची. त्यामुळेच चाहत्यांनी दिशाला मौनी-सूरजच्या घटस्फोटासाठी जबाबदार धरत आहेत.