Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुलगा नाही' म्हणणाऱ्या नातेवाईकांना सडेतोड उत्तर; सेलिब्रिटी बहिणींनी आई-वडिलांसाठी खरेदी केलं कोटींचं पेंटहाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:07 IST

1 / 10
समाजात आजही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. आजही ज्या दांपत्याला मुली आहेत, त्यांना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांकडून 'म्हातारपणी तुमचा आधार कोण?' किंवा 'मुली म्हणजे आई-वडिलांवरचं ओझं' असे बोचरे टोमणे ऐकावे लागतात. मात्र, याच बुरसटलेल्या मानसिकतेला आपल्या कर्तृत्वाने आणि यशाने चोख उत्तर दिले आहे ते बॉलीवूडमधील प्रसिद्ध मोहन बहिणींनी.
2 / 10
सुप्रसिद्ध गायिका नीती मोहन, नृत्यांगना शक्ती मोहन आणि अभिनेत्री मुक्ती मोहन या तिन्ही बहिणी मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय आहेत. या तिघींनी आपल्या आई-वडिलांना कधीही मुलाची उणीव भासू नये, यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांना कोट्यवधी रुपयांचे एक आलिशान तीन मजली पेंटहाऊस भेट दिले.
3 / 10
नुकतंच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या भेटीत या नीती, शक्ती आणि मुक्ती यांनी त्यांच्या या 'ग्रीन होम'ची सफर घडवली.
4 / 10
कांदिवली येथील एका आलिशान इमारतीच्या २९ व्या मजल्यावर असलेले हे तीन मजली पेंटहाऊस आहे.
5 / 10
या घराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील हिरवळ. घरात जवळपास ४०० झाडे लावण्यात आली आहेत.
6 / 10
याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, 'आमच्या आई-वडिलांना चार मुली आहेत, म्हणून या घरात ४०० झाडे आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात निसर्गाचा स्पर्श जाणवेल'.
7 / 10
मूळच्या दिल्लीच्या असलेल्या या कुटुंबाला मुंबईतही दिल्लीच्या घरासारखा अनुभव मिळावा, यासाठी घराची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे.
8 / 10
'आम्ही चार मुली असल्यामुळे नातेवाईक आम्हाला 'ओझं' म्हणायचे. आई-वडिलांना मुलगा नसल्याची खंत वाटू नये आणि त्यांनी एका मोठ्या घरात राजा-राणीसारखं राहावं, यासाठी आम्ही हे पेंटहाऊस त्यांना भेट दिलं' असे शक्तीने सांगितले.
9 / 10
नीती आणि मुक्ती यांचे लग्न झाले असून त्या आपापल्या संसारात सुखी आहेत. मात्र, शक्ती मोहन अजूनही अविवाहित आहे.
10 / 10
लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली, 'स्वतंत्र असण्याने मला आनंद मिळतो. मुक्तीच्या लग्नात नातेवाईकांनी लग्नासाठी खूप दबाव टाकला, पण मला माझं स्वातंत्र्य प्रिय आहे'.
टॅग्स :शक्ती मोहनसेलिब्रिटीमुंबईनीति मोहन