एका कचराकुंडीत दिशानी सापडली होती. चिमुकल्या दिशानीला कचरा कुंचीत फेकुन तिच्या आई-वडिलांनी पळ काढला होता.त्या रस्त्यावरून अनेकजण गेलेत. पण जीवाच्या आकांताने रडणाºया त्या चिमुकलीला पाहून कुणाचेही हृदय द्रवले नाही. एका बंगाली न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आणि मिथुनने नेमकी ही बातमी ऐकून या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
या चिमुकलीला दत्तक घेतल्यानंतर मिथुनने तिचे नाव दिशानी ठेवले. मिथुनची पत्नी योगिता बाली हिनेही दिशानीचे मनापासून स्वागत केले.यानंतर मिथुनने दिशानीला दत्तक घेतले आणि केवळ दिशानीचेच नाही तर मिथुनचेही आयुष्य बदलले. दिशानी प्रचंड स्टाईलिश आणि सुंदर आहे. बॉलिवूड स्टार बनण्याचे सगळे गुण तिच्या आहेत. दिशानीऐवजी मिथुनला तीन मुलगे आहेत. महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती अशी त्यांची नावे आहेत.
बॉलिवूडमध्ये येण्यास आतूर असलेली दिशानी बॉलिवूड चित्रपटांची मोठी चाहती आहे. सलमान खानचीही ती खूप मोठी चाहती आहे. सध्या दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकादमीत अॅक्टिंग शिकतेय. दिशानी सोशल मीडियावरही कमालीची अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात फोटोंमध्ये ती न्यूयॉर्क फिल्म अकादमीच्या फ्रेन्ड्ससोबत दिसतेय.