Join us

५४ व्या वर्षी बोहल्यावर चढला स्टार अभिनेता, १७ वर्षांनी लहान आहे पत्नी, फिल्मी आहे लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:19 IST

1 / 10
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमध्ये फ्रेडी सोडावालाची भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेले मनिष चौधरी हे लोकप्रिय अभिनेते आहेत. मनीष हे २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.
2 / 10
मनिष चौधरी आता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनीष यांनी त्यांच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला.
3 / 10
मनीष चौधरी यांच्या पत्नी श्रुती मिश्रा या त्यांच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान आहेत. या जोडप्याने २०२३ साली मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं.
4 / 10
मनिष आणि श्रुती यांच्यात वयाचं अंतर ही कधी समस्या बनलीच नाही. पण, श्रुतीला या नात्यासाठी पालकांची मनधरणी करण्यात दोन वर्षं लागली.
5 / 10
'हॉटरफ्लाय'शी बोलताना श्रुतीने मनीष यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. ती म्हणाली, 'आमची भेट एका थिएटरमध्ये झाली होती. मला खूप आनंद झाला की मुंबईत मला माझ्यासारख्याच विचारांची व्यक्ती भेटली'वयातील फरकाबद्दल बोलताना श्रुती म्हणाली, “आमच्या वयात १७ वर्षांचं अंतर आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं वय किती आहे? आणि त्यांनी सांगितलं, तेव्हा मी म्हणाले, खरंच? मला माहित होतं की वयात फरक आहे, पण नेमका किती आहे, हे माहित नव्हतं'.
6 / 10
वयातील फरकाबद्दल बोलताना श्रुती म्हणाली, “आमच्या वयात १७ वर्षांचं अंतर आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं वय किती आहे? आणि त्यांनी सांगितलं, तेव्हा मी म्हणाले, खरंच? मला माहित होतं की वयात फरक आहे, पण नेमका किती आहे, हे माहित नव्हतं'.
7 / 10
श्रुती पुढे म्हणाली, 'वयातील अंतर असूनही मला आतून वाटत होतं की आम्ही दीर्घकाळ एकत्र राहणार आहोत.
8 / 10
श्रुतीने सांगितलं, 'कुटुंबाची मंजूरी मिळवण्यासठी मला दोन वर्षे लागली. मी त्यांना समजावलं की हाच तो माणूस आहे ज्याच्याशी मी लग्न करणार आहे, नाहीतर मी लग्न करणार नाही. सगळ्यांना शांतपणे पटवून देण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली'.
9 / 10
श्रुतीनेने प्रपोजलबद्दलही सांगितलं. ती म्हणाली, 'ते सर्वात कॅज्युअल प्रपोजल होतं. कोविडच्या काळात आम्ही सोफ्यावर बसलो होतो आणि त्यांनी विचारलं, 'तू माझ्याशी लग्न करशील का?'. यावर मी विचारलं, 'हे प्रपोजल आहे का?'. तर ते त्यांनी हो म्हटलं. यावर 'ठीक आहे' असं उत्तर दिलं.
10 / 10
मनीष चौधरी यांनी याआधी २०१६ मध्ये एंगेजमेंट केली होती, पण ते नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर २०२३ मध्ये त्याने श्रुती मिश्राशी लग्न केलं. त्यावेळी मनीष ५४ वर्षांचे होते आणि श्रुती ३७ वर्षांची होती.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडलग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट