Join us

चाळीशी कधीचीच पार केलेली मलायका अरोरा आजही दिसते इतकी हॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST

बॉलिवूडची ग्लॅमरस अ‍ॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायकाचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. आज मलायका ४४ वर्षांची झाली. अर्थात तिच्याकडे पाहिल्यानंतर तिने चाळीशी कधीचीच ओलांडलीय, हे चुकूनही खरे वाटणार नाही.

बॉलिवूडची ग्लॅमरस अ‍ॅण्ड हॉट अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायकाचा आज (२३ आॅक्टोबर) वाढदिवस. आज मलायका ४४ वर्षांची झाली. अर्थात तिच्याकडे पाहिल्यानंतर तिने चाळीशी कधीचीच ओलांडलीय, हे चुकूनही खरे वाटणार नाही.‘छैय्या छैय्या’ हे मलायकाचे गाजलेले आयटम साँग. अशा अनेक गाण्यांमध्ये मलायका झळकली होती. गुर नाल इश्क मिठा, आयो रे मारो ढोल ना , प्यार के गीत ही तिची काही प्रसिद्ध गाणी आहेत.मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केले. एका कॉफी जाहिरातीच्या दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले.मलायका आणि अरबाजला अरहान हा मुलगा आहे. पण, दुदैर्वाने या दोघांनी लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.अरबाजसोबत घटस्फोट घेतला त्यादरम्यान मलायकाचे नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडले गेले. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या. ही बातमी सगळ्यांसाठीच शॉकिंग होती.