खुद्द अहानाचे म्हणाल तर तिने या कमेंट्स अजिबात गंभीरपणे घेतल्या नाहीत. या ट्रोलिंगनंतरही तिने आपले अनेक फोटो शेअर केलेत. शेअरच केले नाही तर ट्रोलिंग करणाºयांना अप्रत्यक्षपणे फटकारलेही. ‘डू वुई रिअली शेप दी वर्ल्ड’, असे तिने म्हटले. अर्थात समजणाºयांना इशारा पुरेसा असतो.
ALSO READ : अहाना कुमरा जवळ जवळ झाली होती बाद! नशिबाने मिळाला ‘Lipstick under my burkha’!!
अहाना कुमरा हिच्याबद्दल सांगायचे तर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’या चित्रपटात काम करण्याची संधी ती जवळजवळ घालवून बसली होती. पण नशिबाने साथ दिली आणि हा चित्रपट अहानाच्या वाट्याला आला. नशिबाची साथ यासाठी कारण, हा चित्रपट मिळण्याबद्दल अहाना स्वत:ला नशिबवाण मानते. या चित्रपटाची आॅफर आली तेव्हा अहाना एका टीव्ही शृंखलेत बिझी होती. तारखांचा मेळ जमत नसल्याने अहानाला मनात असतानाही या चित्रपटाला नकार द्यावा लागला होता. पण अचानक ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ची शूटींग लांबली आणि हा चित्रपट अहानाला मिळाला. शूटींग लांबल्यावर यातील भूमिकेसाठी पुन्हा एकदा अहानाला विचारणा झाली. यावेळी अहानाकडे नकार देण्याचे काही कारणच नव्हते. कारण तिच्याकडे तारखा होत्या. अर्थात चित्रपट मिळवणे तरिही इतके सोपे नव्हते. कारण यासाठी तिला आॅडिशन द्यावे लागणार होते. अहानाने तेही केले. रितसर या चित्रपटासाठी आॅडिशन दिले. ती या आॅडिशनमध्ये पास झाली आणि अहानाची चित्रपटात वर्णी लागली.