Join us
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या टेरेसवरच बांधली लग्नगाठ, कृतिका कामरा-गौरव कपूरच्या वेडिंग सेरेमनीचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:58 IST

1 / 7
टीव्ही आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री कृतिका कामरा चर्चेत आहे. स्पोर्ट्स होस्ट, क्रिकेट प्रेझेंटर गौरव कपूरसोबत तिने काल लग्नगाठ बांधली.
2 / 7
कृतिका आणि गौरवने ११ मार्च रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घराच्या टेरेसवरच त्यांनी कागदावर सह्या करत रजिस्टर पद्धतीने लग्न केलं.
3 / 7
कृतिका आणि गौरवचे हे रोमँटिक फोटोही आता व्हायरल होत आहेत. दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून गेले आहेत.
4 / 7
या इंटिमेट वेडिंग सेरेमनीसाठी कृतिकाने टसर सिल्कची लाल रंगाची चंदेरी साडी परिधान केली होती. भरजरी नेकलेस, मॅचिंग इअररिंग्सने तिच्या सौंदर्यात भर घातली.
5 / 7
तर गौरव रॉयल पण तेवढाच सोफेस्टिकेटेड लूकमध्ये होता. त्याने कस्टम आयव्हरी बंदगला परिधान केला होता. त्याच्या जॅकेटवर अँटिक गोल्ड बटन आहेत आणि पॉकेट स्क्वेअरमुळे त्याच्या लूकला चार चाँद लागले.
6 / 7
कृतिका आणि गौरवच्या या आनंदाच्या क्षणी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सोहा अली खान, श्रेया धन्वंतरी, मलायका अरोरा आणि तिच्या काही मैत्रिणींसोबत कृतिकाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
7 / 7
गौरव प्रसिद्ध होस्ट असल्याने क्रिकेट क्षेत्रातीलही अनेक दिग्गज या सोहळ्याला आवर्जुन आले होते. जहीर खान-सागरिका, युवराज सिंग-हेजल यांची झलक दिसली. फोटो सौजन्य - storiesbyjosephradhik instagram
टॅग्स :कृतिका कामराशुभविवाहबॉलिवूडसेलिब्रिटी