Join us  

कश्मिरा शाहचा पहिला नवरा कोण माहितीये का? घटस्फोटानंतर कृष्णा अभिषेकसोबत थाटला दुसरा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 11:46 AM

1 / 9
'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) . प्रोफेशन लाइफसोबत कृष्णा अनेकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो.
2 / 9
कृष्णा अभिषेकने अभिनेत्री कश्मिरा शाहसोबत (Kashmera Shah) लग्न केलं असून कश्मिरा अनेकदा तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत येत असते.
3 / 9
वयाच्या ४९ व्या वर्षी बोल्डनेसमुळे चर्चेत येणारी कश्मिरा तिच्या वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत येते. कश्मिराने कृष्णासोबत लग्न केलं असून यापूर्वी तिने एका निर्मात्यासोबत लग्नगाठ बांधली होती.
4 / 9
कृष्णाने त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या कश्मिरासोबत लग्न केलं असून २००५ मध्ये या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
5 / 9
कृष्णाला डेट करण्यापूर्वी कश्मिरा, ब्रॅड लिस्टरमॅन या निर्मात्याची पत्नी होती. परंतु, २००७ मध्ये तिने पतीला घटस्फोट दिला आणि कृष्णासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली.
6 / 9
'और पप्पू पास हो गया' या चित्रपटाचं जयपूरमध्ये चित्रीकरण सुरु असतांना कश्मिरा आणि कृष्णाची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
7 / 9
२००५ मध्ये कश्मिरा आणि कृष्णाची भेट झाली. त्यानंतर २००७ मध्ये कश्मिराने पती ब्रॅडला घटस्फोट दिला. त्यानंतर ती कृष्णासोबत काही वर्ष लिव्ह इनमध्ये राहिली व २०१३ मध्ये या जोडीने लग्न केलं.
8 / 9
मे २०१७ मध्ये कश्मिराने सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.
9 / 9
कश्मिराने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'प्यार तो होना ही था', 'हिंदुस्तान की कसम', 'हेराफेरी', आंखें, मर्डर, आणि वेकअप सिड (2009) या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
टॅग्स :कृष्णा अभिषेकबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा