SEE PICS : बेबोसाठी सैफ बनला फोटोग्राफर, सैफचेच शर्ट घालून करिना कपूरने दिल्या पोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 15:03 IST
1 / 11बेगम करिना कपूर खान दुस-यांदा आई होणार आहे. कालच तिने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आणि याचदरम्यान तिच्या बोल्ड फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले.2 / 11फिल्मफेअर मॅगझिनसाठी बेबोने हे बोल्ड फोटोशूट केले.3 / 11कोरोनाच्या भीतीने करिनाच्या अलिशान घरातच हे फोटोशूट केले गेले.4 / 11 हे फोटोशूट यासाठीही खास आहे कारण, हे सगळे फोटो सैफ अली खानने क्लिक केले आहेत.5 / 11इतकेच नाही तर या फोटोशूटसाठी बेगमने सैफचेच शर्ट घातले आहे.6 / 11या फोटोशूटमध्ये करिनाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय.7 / 11फोटोज शेअर करताना बेबोने सैफवर प्रेमाची बरसात केलीय. आय लव्ह लव्ह लव्ह सैफ ... मला हे शर्ट दिल्याबद्दल आणि हे फोटो काढल्याबद्दल खूप सारे प्रेम, असे तिने लिहिलेय.8 / 11फोटोत करिनाच्या अलिशान घराची झलकही पाहायला मिळतेय.9 / 11कधी कम्प्युटर टेबलवर तर कधी बुक शेल्फच्या समोर तिने पोज दिल्या आहेत.10 / 11करीना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. 11 / 11याशिवाय तिने करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा 'तख्त'देखील साईन केला आहे. ज्यात तिच्यासोबत अनिल कपूर, विकी कौशल, रणवीर सिंग, आलिया भट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत.