Join us
Daily Top 2Weekly Top 5

"घरात कोणीतरी घुसतं, मुलांसमोर आपल्या नवऱ्यावर हल्ला होतो हे...", करीना कपूर पहिल्यांदाच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:45 IST

1 / 11
अभिनेता सैफ अली खानवर यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात हल्ला झाला. घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर चाकूहल्ला केला. तैमुर आणि जेह या दोन्ही मुलांसमोरच ही घटना घडली.
2 / 11
या सगळ्यावर पहिल्यांदाच करीना कपूर बोलली आहे. एक आई आणि पत्नी म्हणून ती या घटनेला कशी सामोरी याविषयी तिने भाष्य केलं आहे.
3 / 11
बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, 'अजूनही त्या गोष्टीतून सावरत आहे. आपल्या लहान मुलाच्या खोलीत कोणीतरी घुसलं हे पचवणंच खूप अवघड जातंय. कारण मुंबईत असं झालेलं मी कधीच ऐकलं नव्हतं. '
4 / 11
'अमेरिकेत सेलिब्रिटींच्या घरात घुसखोरी, चोरीच्या घटना घडल्याचं आपण ऐकतो. मुंबईत असं आपल्या घरात कोणी घुसतो आणि आपल्या नवऱ्यावर चाकू हल्ला होतो, हे सगळं अजूनही मला विश्वास न बसणारंच आहे. सुरुवातीचे काही महिने मी खूप अस्वस्थ होते. मला झोप यायची नाही, पुन्हा सगळं नॉर्मल आहे म्हणत जगणं कठीण जात होतं.'
5 / 11
'आठवणी कितीही पुसट होत गेल्या तरी काही आठवणी मनाच्या कोपऱ्यात त्या कुठे ना कुठे कोरल्या जातात. हे मृत्यूसारखं आहे, जेव्हा तुम्ही कोणाला गमावता तेव्हा तुम्ही त्यातून कधीच बाहेर पडत नाही. '
6 / 11
'जेह तर नेहमी म्हणतो की माझे वडील बॅटमॅन, आयर्न मॅन आहेत. कारण ते कोणालाही हरवू शकतात. त्याच्यासाठी सैफ हिरो आहे. आमच्या सर्वांसाठीच तो आयर्न मॅन आहे.'
7 / 11
तसंच मी पत्नीही आहे. माझ्या नवऱ्यावर हल्ला झाला होता. या सगळ्याला मला सामोरं जावं लागणार आहे हे मला कळून चुकलं होतं. देवाचीच कृपा की आज आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही एक युनिट म्हणून नक्कीच स्ट्राँग आहोत कारण आम्ही तो प्रसंग बघितला आहे.'
8 / 11
अशा प्रसंगाला धीराने सामोरं जाणं काय असतं हे माझ्या दोन्ही मुलांनी आता या लहान वयातच पाहिलं. त्यामुळे ते त्याच स्ट्राँग विचाराने मोठी होतील. कारण त्यांनी आपल्या वडिलांवरच हल्ला होताना पाहिलं आहे. '
9 / 11
'माझी मुलं सुरक्षित आहेत यासाठी मी देवाचेच आभार मानेन. त्यांनी रक्तपात पाहिला, बरंच काही पाहिलं पण तो ट्रॉमाच त्या दोघांना स्ट्राँग माणूस बनवेल. कारण ते आजपर्यंत सुरक्षित वातावरणात राहिले आणि अचानक त्यांनी हा प्रसंग पाहिला. त्यामुळे आता त्यांना या घटनेने वास्तविकता दाखवली असं मी म्हणेन.'
10 / 11
'आयुष्यात असंही काही घडू शकतं हे त्यांना समजलं. नक्कीच या वयात त्यांनी हे पाहायला नको होतं. पण यातून आम्ही काहीतरी चांगलं घेऊ अशी मला आशा आहे.'
11 / 11
आई म्हणून मला त्यांच्यावर ते टेन्शन लादायचं नाही. पण एक व्यक्ती म्हणून नक्कीच मी या प्रसंगामुळे हादरले आहे. पण जे झालं ते झालंच. सैफ म्हणतो तसं आपण कायम या भीतीखाली, टेन्शनखाली जगू शकत नाही. पण जे झालं ते दुर्दैवीच होतं. असं कोणाही मुलांसोबत, आईसोबत, वडिलांसोबत, कुटुंबासोबत घडू नये.'
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुरबॉलिवूड