"मुंबई पोलिसांसारखे कोणी नाही"; कॅफेवर झालेल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माने मुंबईबद्दल व्यक्त केला अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:39 IST
1 / 7कॅनडातील रेस्टॉरंटवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबद्दल बोलताना कपिल शर्मा म्हणाला की, त्याला असे वाटते की 'तेथील पोलिसांकडे अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे अधिकार नाहीत.'2 / 7कपिलने सांगितले की, 'ही गोळीबाराची घटना कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये घडली आणि मला वाटते की तिथे तीन वेळा गोळीबार झाला आहे. मला वाटते की तेथील नियमांनुसार कदाचित पोलिसांकडे अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतकी शक्ती नाही.'3 / 7कपिल शर्माने पुढे सांगितले की, जेव्हा त्यांच्या कॅफेवर हल्ला झाला, तेव्हा हे प्रकरण स्थानिक पोलिसांऐवजी फेडरल गव्हर्नमेंटकडे गेले. 'जेव्हा आमच्या कॅफेचे प्रकरण घडले, तेव्हा हा केस फेडरल स्तरावर गेला. ज्याप्रमाणे आपल्याकडे सेंट्रल गव्हर्मेंट असते, त्याचप्रमाणे कॅनडाच्या पार्लमेंटमध्येही यावर चर्चा झाली,' असे त्याने स्पष्ट केले.4 / 7अनेक लोकांनी त्याला फोन करून सांगितले होते की, कॅनडात यापूर्वीही अशा अनेक घटना घडत होत्या, पण जेव्हा त्याच्या कॅफेवर गोळीबार झाला, तेव्हा ती मोठी बातमी बनली. 'आता तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत,' असे त्याने सांगितले.5 / 7'खरं सांगायचं तर, प्रत्येक हल्ल्यानंतर आमच्या कॅफेला मोठी ओपनिंग मिळत होती. त्यामुळे देव आमच्यासोबत आहे आणि सगळं ठीक आहे,' असेही कपिलने नमूद केले.6 / 7कपिलने यावेळी आपल्या देशातील कायद्याची आणि मुंबई शहराची तुलना कॅनडाशी केली. तो म्हणाला, 'मी स्वतःला मुंबईत किंवा आपल्या देशात कधीच असुरक्षित मानले नाही आणि मुंबईसारखे आणि इथल्या पोलिसांसारखे दुसरे कोणीही नाही.'7 / 7कपिलचा कॅप्स कॅफे जुलैमध्ये सुरु झाला. कॅफे सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच त्यावर हल्ला झाला. ७ ऑगस्ट आणि १६ ऑक्टोबर रोजी आणखी हल्ले झाले. सुदैवाने, या हल्ल्यांमध्ये कोणतीही मानवी हानी झाली नाही.