Join us  

एका गाण्याचे स्टार...! फक्त एका गाण्याने यांना बनवले स्टार, आज आहेत गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 2:27 PM

1 / 8
सिद्धार्थ रे - छुपाना भी नहीं आता... हे गाणे तुम्ही ऐकलेच असेल. बाजीगर सिनेमातील या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ रे दिसला होता. यानंतर सिद्धार्थ रे बºयाच सिनेमात दिसला आणि हळूहळू गायब झाला.
2 / 8
करण नाथ- सन 2002 मध्ये प्रदर्शित ‘ये दिल आशकाना’ या सिनेमात अभिनेता करणनाथ लीड रोलमध्ये होता. आज करण ‘ये दिल आशकाना’ या गाण्यासाठीच लोकांच्या आठवणीत आहे.
3 / 8
कमल सदाना- कमल सदानाला ‘रंग’ या सिनेमासाठीच ओळखले जातात. ते सुद्धा या सिनेमातील हिट गाण्यांमुळे. तुझे ना देखू तो चैन मुझे आता नहीं है सारख्या हिट गाण्यांमुळे कमल लोकांचा आवडता स्टार बनला. त्याआधर काजोलसोबतच्या ‘बेखुदी’ या सिनेमातील ‘खत मैंने तेरे नाम लिखा’ या गाण्यामुळे तो रातोरात फेमस झाला होता.
4 / 8
नकुल कपूर- तुमसे अच्छा कौन है या सिनेमाची गाणी तुम्ही ऐकलीच असतील. यात नकुल कपूर लीड रोलमध्ये होता. या सिनेमाच्या गाण्यांमुळे नकुल फेमस झाला. पण हा त्याचा पहिला व शेवटचा हिट सिनेमा ठरला.
5 / 8
सूरज- जाते हो परदेस पिया हे गाणे कुणी ऐकले नसेन. हे गाणे आजही लोकांच्या आठवणीत आहे. पण गाण्यातील हिरो सूरज आज लोकांच्या विस्मरणात गेला आहे. हे गाणे 1991 साली रिलीज झालेल्या जीना तेरी गली में या सिनेमातील होते.
6 / 8
पोमी देव- पोमी देव एका गाण्यासाठीच नेहमी आठवणीत राहील. ते गाणे म्हणजे, आजा बहारों की मल्लिका, मौसम बदल जाए दिल का.... 1991 साली आलेल्या दस्तूर या सिनेमातील हे गाणे आजही लोक आवडीने ऐकतात.
7 / 8
रोहित भाटिया - 1992 साली रिलीज कल की आवाज या सिनेमातील ‘तुम्हारी नजरों में हमने देखा’साठी रोहित भाटिया लोकांच्या आठवणीत आहे.
8 / 8
विकास कालंतरी- 2001 साली रिलीज ‘प्यार जिंदगी है’चे एक गाणे ‘मैं चाहता हूं तुझको दिल ओ जान की तरह’ तुफान लोकप्रिय झाले होते. या गाण्यातील विकास कालंतरी आज बॉलिवूडमधून गायब झाला आहे. पण हे त्याचे गाणे आजही आवडीने लोक ऐकतात.
टॅग्स :बॉलिवूड