जॅकलिन फर्नांडिस पोहोचली बंगळुरूच्या आश्रमात, श्री श्री रविशंकर यांच्या भेटीनंतर जॅकलिन म्हणाली "माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलंय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:50 IST
1 / 10श्रीलंकन ब्युटी क्वीन जॅकलीन फर्नांडिस Jacqueline Fernandez) आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2 / 10अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून जॅकलिनने तिची ओळख निर्माण केली. जॅकलिन फर्नांडिस नेहमी तिच्या चाहत्यांसाठी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अपडेट्स शेअर करत असते. 3 / 10जॅकलिन सध्या बंगळुरुमधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात (Jacqueline Fernandez Reaches Bengaluru Ashram) पोहचली आहे. 4 / 10यात ती श्री श्री रविशंकर यांच्यासह दिसत आहे. तिचं हे साधं, शांत आणि आध्यात्मिक रूप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.5 / 10 जॅकलिननं सोशल मीडियावर श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.6 / 10या फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलंय. मला मार्ग दाखवण्यासाठी गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे मनापासून धन्यवाद. मी तुमची ऋणी आहे', असं तिने लिहिलंय.7 / 10आश्रमात जॅकलिननं प्राण्यासोबत वेळ घालवला. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत खूप कौतुक केले. 8 / 10श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात दाखल झाल्यानंतर तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच अध्यात्मिक झलक पाहायला मिळाली आहे.9 / 10जॅकलिनच्या आधी हिना खान आणि विक्रांत मेसी सारख्या स्टार्सनीही आश्रमाला भेट दिली आहे.10 / 10जॅकलिन सध्या तिच्या 'हाऊसफुल ५' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जो ६ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात लारा दत्ता, दिशा पटानी, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी सारखे स्टार दिसणार आहेत.