जॅकलिनचा बोल्डनेस पाहून युजर्स म्हणाले, 'सुकेश भैया जिंदाबाद…'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 00:08 IST
1 / 6अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच आपले बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जॅकलिनच्या फोटोंवर चाहत्यांच्या सतत कमेंट्स येत आहेत. तसेच, हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.2 / 6जॅकलिन फर्नांडिस आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. 3 / 6या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिस सेक्सी गोल्डन आउटफिटमध्ये दिसून येत आहे. हे पाहून काहींनी तिला सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची आठवण करून दिली आहे.4 / 6सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जॅकलिन फर्नांडिसच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने 'सुकेश भैया जिंदाबाद', असे लिहिले आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने किती पैसे खाल्ले, असे लिहिले आहे.5 / 6या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिसने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा कशा ओलांडल्या आहेत, हे तुम्ही पाहू शकता. क्रॉस नेकसह जॅकलिनच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.6 / 6दरम्यान, 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात जॅकलिनचे नाव सर्वात आधी आले होते. मात्र, अनेकवेळा चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळाला आले.