इशाचा आवडता रंग लवेंडर (फिक्कट जांभळा रंग) असल्याने पाटीर्ची थीमसुद्धा लवेंडरच ठेवण्यात आलेली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून अहाना या पार्टीसाठी खपत होती. कित्येक दिवसांपासून तिची तयारी सुरु होती. अखेर काल तो दिवस आलाच. इशा व तिचा हॅण्डसम हबी भरत तख्तानी या पार्टीत पोहोचले अन् सगळाच जल्लोष झाला. इशा तर हरकून गेली. लवेंडर रंगाच्या शिफॉन विंटेज गाऊनमध्ये इशा या पार्टीत पोहोचली होती. या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.अहानाने इशाला थांगपत्ता न लागू देता, हा गाऊन डिझाईन करवून घेतला होता. यासाठी भरतने तिची मदत केली होती.
या पार्टीत विविध खेळ खेळले गेले. पार्टीत येणा-या पाहुण्यांमध्ये ज्यांना मुलगी व्हावी, असे वाटतेय, त्यांनी गुलाबी रंगाचा ड्रेस घालावा आणि ज्यांना मुलगा व्हावा असे वाटते, त्यांनी निळ्या रंगाचा ड्रेस घालावा, असे सांगण्यात आले होते. या सरप्राईज पार्टीला अहाना व इशाची आई हेमामालिनी याही हजर होत्या. इशा व भरत या दोघांनी केक कापून पार्टीची सुरुवात केली.
ALSO READ : ‘या’ अभिनेत्रींनी एकत्र बेबी बम्प दाखवित शेअर केला फोटो!
या सरप्राइज पार्टीबद्दल अहाना सूपर एक्साईटेड होती. तीन वर्षांपूर्वी मी गरोदर होते, तेव्हा इशाने माझ्यासाठी अशीच सरप्राइज पार्टी ठेवली होती. म्हणून इशासाठीही मी तेच करण्याचे ठरवले, असे अहानाने सांगितले. भरतनेही माझी खूप मदत केली. इशासाठी गाऊन डिझाइन करण्यासाठी तिच्या मापाची गरज होती. तिला कळू न देता गाऊनचा माप भरतने मिळवून दिला, असे अहाना म्हणाली.