Join us  

एकदा पाहाच...! राजकुमारच्या घराचे हे Inside Photos पाहून म्हणाल, अतिसुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 8:00 AM

1 / 11
बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता राजकुमार रावने नुकतेच मुंबईत एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केले. त्याच्या या नव्या घराचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. (Rajkummar Rao lavish home)
2 / 11
गुडगावमध्ये जन्मलेला आणि 16 लोकांच्या संयुक्त कुटुंबात राहणा-या राजकुमारला मुंबई या स्वप्ननगरीत एक हक्काचे घर हवे होते. अखेर त्याची ही इच्छा पुर्ण झाली.
3 / 11
म्हणायला हे घर दुमली अपार्टमेंट आहे, पण याच्या आतील नजारा महालापेक्षा कमी नाही.
4 / 11
एका पेन्ट ब्रँडने राजकुमारच्या घरातील आतील नजारा शूट केला आहे. आता त्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
5 / 11
राजकुमारला फार झगमगाट आवडत नाही. त्याची ही आवड लक्षात घेऊन त्याचे हे घर सजवण्यात आले आहे.
6 / 11
घरात आल्यावर शांती आणि आनंद झाला पाहिजे. त्यानुसार, प्रत्येक कोपरा न कोपरा सजवण्यात आला आहे.
7 / 11
लिव्हिंग रूममध्ये बसून वाचन करणे, कॉफी पिणे आणि बाल्कनीतून समोरचा नजरा न्याहाळत बसायला त्याला आवडते.
8 / 11
राजकुमारच्या घरातील फर्निचर, आर्ट वर्क अगदी छोट्या छोट्या वस्तू युनिक आहेत.
9 / 11
राजकुमारचे हे स्वप्नातले घर पूर्ण व्हायला सुमारे दोन वर्षे लागलीत. प्रत्येक गोष्ट त्याने त्याच्या आवडीने खरेदी केलीे. कलर, टेक्सचर, घरातील शोभेची प्रत्येक वस्तू त्याने स्वत: स्टोर्समध्ये जाऊन निवडली.
10 / 11
अवार्ड, पुरस्कारासाठी राजकुमारने घरातील एक खास कोपरा राखीव ठेवला आहे.
11 / 11
राजकुमारच्या घराचा वरचा फ्लोर मिटींग व पार्टीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या वरच्या माळ्यावर जाण्यासाठीचा सुंदर जीना पाहण्यासारखा आहे.
टॅग्स :राजकुमार राव