कोविडमध्ये जगण्यासाठी दोन मित्रांचा संघर्ष; हृदयस्पर्शी कहाणी असणारा 'हा' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत, तुम्ही पाहिलाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:35 IST
1 / 7कोविडचा काळ आजही आठवला तरीही सर्वांच्या अंगावर काटा उमटल्याशिवाय राहत नाही. अनेकांसाठी हा काळ दुःखदायक होता. याच वेदनादायी काळात घडलेल्या घटनेवर आधारीत एक सिनेमा आज ऑस्करच्या शर्यतीत आहे. 2 / 7या सिनेमाचं नाव आहे 'होमबाऊंड'. भारतातर्फे हा सिनेमा ऑस्करसाठी निवडला गेला आहे. जागतिक सिनेमांच्या शर्यतीत हा सिनेमा ऑस्करच्या टॉप १५ मध्ये आहे. 3 / 7'होमबाऊंड' सिनेमात भारताच्या मातीत घडलेली कहाणी बघायला मिळते. वाल्मिकी आणि शोएब या हिंदू-मुस्लीम मित्रांची कहाणी सिनेमात दिसते.4 / 7दोघेही भारताच्या एका ग्रामीण भागात राहताना दिसतात. परंतु कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी दोघेही शहरातील एका फॅक्टरीत कामाला लागतात5 / 7सर्व सुरळीत चालू असतं तोच अचानक लॉकडाऊनची घोषणा होते. हे दोघेही ज्या कंपनीत काम करतात ती फॅक्टरी बंद पडते. शेवटी नाईलाजास्तव दोघांनाही गावाकडे जावं लागतं.6 / 7ट्रेन बंद असतात. त्यामुळे ते दोघेही एका ट्रकमध्ये प्रवास करुन गावी जाण्याचा प्रयत्न करतात. दोघांपैकी शोएबला प्रवासात ताप भरतो आणि खोकला येतो. त्यामुळे सहप्रवासी कोरोना व्हायरसच्या भीतीने दोघांनाही ट्रकमधून खाली उतरवतात.7 / 7मग पुढे काय होतं? याची हृदयाला स्पर्श करणारी कहाणी सिनेमात दिसते. हा सिनेमा ऑस्करमध्ये निवडला गेला असून २०२६ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हा सिनेमा बाजी मारणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. हा सिनेमा तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघायला मिळणार आहे.