Join us  

ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर! पाहा सुपरस्टार महेश बाबूचा डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 3:22 PM

1 / 9
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. नुकताच त्याने त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा केला.
2 / 9
१९९९ मध्ये महेश बाबूने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ओक्काडू या चित्रपटातून त्याने दाक्षिणात्य कलाविश्वात पदार्पण केलं.
3 / 9
साऊथचा हँण्डसम हंक असलेल्या महेश बाबूने ४८ व्या वर्षात पदार्पण केलं असलं तरीदेखील त्याचा फिटनेस २५ वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा आहे.
4 / 9
महेश बाबू त्याच्या फिटनेसच्या बाबतीत चांगलाच सजग आहे. त्यामुळे तो त्याच्या डाएटकडे आणि वर्कआऊटकडे जातीने लक्ष देतो.
5 / 9
फिट राहण्यासाठी महेश बाबू कोणता डाएट प्लॅन घेतो ते पाहुयात.
6 / 9
महेश बाबू सकाळी ब्रेकफास्टमध्ये ओट्स, अंडी, सुकामेवा आणि ताजी फळं यांचा समावेश करतो.
7 / 9
लंचमध्ये महेश बाबूला प्रोटीन रिच फूड, लीन मीट आणि कार्ब्सयुक्त पदार्थ यांचा समावेश करायला आवडतो.
8 / 9
महेश बाबू रात्रीच्या जेवणात फार मोजक्या पदार्थांचा समावेश करतो. यात चिकन, डाळ किंवा सूप यांचा समावेश असतो.
9 / 9
महेश बाबूने बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं आहे.
टॅग्स :महेश बाबूनम्रता शिरोडकरTollywoodबॉलिवूडसिनेमा