By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:41 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आजही अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. प्रिती तिच्या गालावरच्या खळीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. 2 / 10पण, ती एकमेव नाही बरं का? जिच्या गालावरच्या खळीवर लाखो तरुण मरतात. एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, जिला पाकिस्तानची 'प्रिती झिंटा' म्हणून ओळखलं जातं.3 / 10ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सौंदर्याची खाण असलेली हानिया आमिर (Hania Aamir) आहे. प्रिती झिंटा आणि हानिया आमिरमध्ये बरंच साम्य असल्याचं चाहत्याचं मत आहे.4 / 10विशेष म्हणजे, हानियाची फॅन फॉलोईंग फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहे. भारतात तिची खूप क्रेझ आहे.5 / 10हानियाचे 'मेरे हमसफर', 'दिल रुबा', 'मुझे प्यार हुआ था', 'इश्किया', 'कभी मैं कभी तुम' या शोला भारतातही प्रचंड पसंती मिळाली आहे. 6 / 10हानियाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न होते. पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ याच्या 'सरदारजी ३' मधून ती भारतीय इंडस्ट्रीत एन्ट्री घेणार होती. पण, तिचं ते स्वप्न अपुर्ण राहिलं. 7 / 10पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे तिचा 'सरदारजी ३ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही.8 / 10सध्या हानियाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटही भारतात उपलब्ध नाही, ज्यामुळे भारतीय चाहत्यांचा तिच्याशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.9 / 10हानिया आमिरचे नाव गेल्या काही काळापासून भारतीय रॅपर बादशाहशी जोडले जात आहे. दुबईमध्ये या दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले.10 / 10बादशाहने यावर मौन सोडताना सांगितले की, 'आम्ही फक्त चांगले मित्र आहोत'.दुसरीकडे हानियाने बादशाहला 'रॉकस्टार' म्हणत त्यांच्यातील मैत्रीवर भाष्य केले आहे.