Join us
Daily Top 2Weekly Top 5

अचानक घरातून बेपत्ता झालेला 'हा' अभिनेता, पुढे दहशतवादी म्हणून मारला गेला, शाहिद कपूरसोबत केलेलं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:42 IST

1 / 7
सिनेसृष्टीतील एक अशी कहाणी जी वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी. एक असा अभिनेता ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य उद्धवस्त केलं. पुढे हा अभिनेता दहशतवादी म्हणून मारला गेला. शाहिद कपूरसोबत या अभिनेत्याने काम केलं होतं.
2 / 7
हा अभिनेता म्हणजे साकिब बिलाल. साकिब बिलाल हा मूळचा उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथील रहिवासी होता. त्याला अभिनयाची प्रचंड आवड होती आणि तो दिसायलाही अतिशय देखणा होता.
3 / 7
विशाल भारद्वाज यांच्या 'हैदर' चित्रपटात त्याने एका लहान मुलाची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्याला चांगली ओळख मिळाली होती आणि लोक त्याला 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखू लागले होते.
4 / 7
साकिब अचानक आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे नंतर समोर आले.
5 / 7
माहितीनुसार, साकिब लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. एका चकमकीदरम्यान तो सुरक्षा दलांच्या हाती लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
6 / 7
साकिबच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अभ्यासातही हुशार होता आणि त्याला फुटबॉल खेळण्याची आवड होती. मात्र, चुकीच्या संगतीमुळे आणि दिशाभूल झाल्यामुळे तो दहशतवादाकडे वळला. एका उमद्या अभिनेत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने काश्मीरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
7 / 7
साकिबच्या या बातमीने बॉलिवूडमध्येही खळबळ उडाली आहे. 'कलेच्या जगात नाव कमावण्याची संधी असताना एका तरुणाने अशी वाट का निवडली?' असा प्रश्न विचारला गेला.
टॅग्स :शाहिद कपूरदहशतवादीजम्मू-काश्मीरबॉलिवूड