Join us  

'कॉमेडी सर्कस'च्या गंगुबाईने घटवलं २२ किलो वजन; आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:11 AM

1 / 11
‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली चिमुकली गंगुबाई आठवते का? अर्थात अनेक प्रेक्षकांच्या स्मरणात ही चिमुकली गंगुबाई नक्कीच असेल.
2 / 11
बालकलाकार सलोनी डॅनी हिने ही भूमिका साकारली होती. केवळ ही भूमिका साकारलीच नाही. तर कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.
3 / 11
लहान पणी गोबऱ्या गालांची, सतत बडबड करणारी प्रत्येक प्रेक्षकाला, चाहत्याला आवडायची. मात्र, सलोनी जसजशी मोठ होत गेली. तसं तिच्या वजनावरुन तिची अनेकांनी खिल्लीही उडवली.
4 / 11
मित्रपरिवारातील काही जणांनीदेखील तिला ट्रोल केलं. त्यामुळेच वजन कमी करायच्या जिद्दीने पेटलेल्या सलोनीने चक्क २२ किलो वजन कमी केलं आहे.
5 / 11
कलाविश्वाप्रमाणेच सलोनी सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळेच तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6 / 11
सलोनीमध्ये पूर्वीपेक्षा आता प्रचंड बदल झाला असून ती अत्यंत ग्लॅमरस दिसत असल्याचं पाहायला मिळतं.
7 / 11
सलोनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कलाविश्वात सक्रीय आहे. तिने काही हिंदी व मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे.
8 / 11
अभिनेता शाहरुख खानसोबतही सलोनीने स्क्रीन शेअर केली आहे.
9 / 11
सलोनी 'कॉमेडी सर्कस', 'नमुने', 'बडे भैय्या की दुल्हन', 'तेढी मेढी फॅमिली', 'यह जादू है – जीन का', या मालिकांमध्ये झळकली आहे.
10 / 11
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सलोनीने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
11 / 11
सलोनीला फोटोशूटची प्रचंड आवड असून अनेकदा ती तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
टॅग्स :सलोनी डॅनीटिव्ही कलाकारसिनेमाबॉलिवूड