अक्षय कुमारसोबत झळकलेला अभिनेता कोरोनाच्या संकटात करतोय रुग्णांची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:30 IST
1 / 7अभिनेता आशिष गोखलेने गब्बर इज बॅक, लव्ह यू फॅमिली यांसारख्या हिंदी तर मोगरा फुलला, रेडी मिक्स, बाला यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2 / 7आशिषची सोनी वाहिनीवरील तारा फ्रॉम सातारा या मालिकेतली वरुण माने ही भूमिका तर चांगलीच गाजली होती. 3 / 7आशिष हा आज अभिनेता असला तरी त्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. डॉक्टर म्हणून काम करत असताना अभिनयाची आवड होती आणि त्याचमुळे तो अभिनयक्षेत्राकडे वळला. 4 / 7आता देशावर आलेल्या संकटामुळे त्याने त्याचे डॉक्टर म्हणून असलेले कर्तव्य पूर्ण करण्याचे ठरवले आहे. तो सध्या एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून रुग्णांची सेवा करत आहे. आशिषने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.5 / 7आशिषने त्याचे रुग्णालयातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.6 / 7आशिष गेल्या काही दिवसांपासून एका प्रायव्हेट रुग्णालयात काम करत आहे.7 / 7डॉ. आशिष गोखलेने अक्षय कुमारसोबत गब्बर इज बॅक या चित्रपटात काम केले आहे.