Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट ते क्रिती सनॉनपर्यंत, अभिनेत्रींना बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले मार्क्स पाहून लागेल ४४० व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:48 IST

1 / 8
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री केवळ सुंदरच नाहीत तर अतिशय बुद्धिमानही आहेत. काही अभिनेत्री बोर्डाच्या परीक्षेत टॉपर आहेत तर काहींनी ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. अनुष्का शर्मा, जान्हवी कपूरपासून ते क्रिती सेनॉनपर्यंत.. येथे जाणून घ्या बॉलिवूडच्या टॉप सुंदर अभिनेत्रींचे बोर्ड परीक्षेचे गुण.
2 / 8
बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला ब्युटी विथ ब्रेन म्हटले जाते. ही अभिनेत्री सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप तत्पर होती. दहावीत ९३% आणि १२वीत ८९% गुण मिळाले.
3 / 8
अभिनयासोबतच आपल्या स्टायलिश शैलीने इंडस्ट्रीत ठसा उमटवणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर अभ्यासातही चांगली आहे. तिला दहावीत ७८% आणि १२वीत ८३% गुण मिळाले.
4 / 8
तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे लाखो हृदयावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री दिशा पाटनीलाही अभ्यासात रस होता. हायस्कूलमध्ये म्हणजे १०वीत तिला ६४ टक्के गुण मिळाले.
5 / 8
सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या जान्हवी कपूरने अल्पावधीतच आपला ठसा उमटवला आहे. बी-टाऊनच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. जान्हवी कपूर सुरुवातीपासूनच खूप हुशार आहे. तिला दहावीत ८४% आणि बारावीत ८६% मिळाले होते.
6 / 8
बॉलिवूडची परमसुंदरी क्रिती सनॉनच्या बोर्ड परीक्षेतील गुणांबद्दल बोलायचे झाले तर दहावीत ७२%, बारावीत ८६% मिळाले होते.
7 / 8
डान्स, अभिनय आणि गायनासाठी प्रसिद्ध असलेली श्रद्धा कपूरला दहावीत ७० टक्के आणि १२वीत ९५ टक्के मिळाले होते.
8 / 8
आलिया भट अभ्यासात खूप हुशार होती. दहावीच्या परीक्षेत तिचा निकाल ७१ टक्के लागला, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती नाही.
टॅग्स :आलिया भटक्रिती सनॉनदिशा पाटनीभूमी पेडणेकर जान्हवी कपूरअनुष्का शर्मा