Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या साठीत या मराठमोळ्या अभिनेत्रीनं थाटला संसार, आमिर खानच्या ऑनस्क्रीन आईला इंटरनेटवर मिळाला जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 07:00 IST

1 / 7
प्रसिद्ध अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये चित्रपटांसोबतच अनेक मालिकामध्येही दिसल्या आहेत. 'लगान' या चित्रपटात सुहासिनी यांनी आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती.
2 / 7
याशिवाय अभिनेत्री 'दिल चाहता है' आणि 'जोधा अकबर' सारख्या चित्रपटातही दिसल्या आहेत. मात्र, सुहासिनी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात.
3 / 7
खरं तर, ७२ वर्षीय सुहासिनी यांनी २०११ मध्ये लग्न केल्यावर प्रकाशझोतात आल्या. सुहासिनी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांनी हे सत्य ४ वर्षे लपवून ठेवले होते.
4 / 7
एका मुलाखतीदरम्यान सुहासिनी यांनी सांगितले होते की, त्यांनी फिजिक्सचे प्रोफेसर अतुल गुर्टू यांच्याशी लग्न केले. सुहासिनी आणि अतुल यांची भेट फेसबुकवर झाली होती.
5 / 7
दोघांची आधी मैत्री होते, मग सुहासिनी आणि अतुल हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर २०११ मध्ये दोघांनी कोर्टात लग्न केले. यानंतर त्यांनी मंदिरात सर्व रितीरिवाजांनी लग्न केले.
6 / 7
एका मुलाखतीत सुहासिनी आणि अतुल यांनी त्यांच्या लग्नाचा एक मजेदार किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही पंडितजींना सांगितले की आम्ही वधू-वर आहोत, तेव्हा ते चकित झाले. ते स्तब्ध झाले आणि म्हणाले, तुम्ही दोघेही... खूप चांगले... खूप चांगले.
7 / 7
वयाच्या ६०व्या वर्षी अतुल यांच्यासोबतच्या लग्नाबाबत सुहासिनी म्हणाल्या होत्या की, 'जेव्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय नसते, तेच लग्नाचे असतं. योग्य आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी योग्य वय आणि वेळ नसतो.'
टॅग्स :आमिर खान