Join us  

'सोल्जर' सिनेमातील जोजो आठवतोय का? अभिनय सोडून करतोय 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 8:00 AM

1 / 9
बॉबी देओल आणि प्रिती झिंटा यांची मुख्य भूमिका असलेला सोल्जर चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल.
2 / 9
हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला होता.
3 / 9
या चित्रपटात बॉबीसह जोजो ही खलनायकाची भूमिकादेखील विशेष लोकप्रिय झाली होती.
4 / 9
विचित्र हेअरस्टाइल आणि अतरंगी कारनामे यामुळे जोजो विशेष लोकप्रिय झाला.
5 / 9
या चित्रपटात शरत सक्सेना यांच्या मुलाची जोजोची भूमिका अभिनेता जीतू वर्मा यांने साकारली होती.
6 / 9
खलनायकी भूमिकेला विनोदी टच देत जोजोची भूमिका जीतू वर्माने गाजवली. परंतु, आता त्याच्यात कमालीचा बदल झाला आहे.
7 / 9
जीतू वर्मा आता अभिनय क्षेत्रात कार्यरत नसला तरीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे.
8 / 9
जीतूला घोडेस्वारीचा छंद असून तो याच क्षेत्रात करिअर करत आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये जीतूने कलाकारांना घोडेस्वारी शिकवल्याचंही म्हटलं जातं.
9 / 9
जीतूने त्याच्या कारकिर्दीमध्ये बड़े मियां छोटे मियां, बादल, टार्झन: द वंडर कार, बोल बच्चन आणि जय हो या चित्रपटांमध्ये झळकला. तसचं अलिकडे आलेल्या मिर्जापुर 2 या सीरिजमध्येही त्याने काम केलं.
टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबॉबी देओलप्रीती झिंटाबॉलिवूड