Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे अभिनेते आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 17:35 IST

1 / 8
अजय देवगणची पत्नी काजोल असून त्या दोघांनी 1999 मध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले. काजोल ही प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. काजोल आणि अजय यांनी नितारा आणि युग अशी दोन मुले आहेत.
2 / 8
प्रसिद्ध अभिनेता राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरवचे लग्न संजय दत्तची बहीण नम्रता द्त्तसोबत झाले आहे. कुमार गौरव हा प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा जावई आहे.
3 / 8
अक्षय कुमार हा सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिम्पल कपाडियाचा जावई आहे. त्याचे लग्न अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोबत झाले आहे.
4 / 8
कुणाल कपूर हा अमिताभ बच्चन यांचे छोटे भाऊ अजिताभ यांचा जावई आहे. अजिताभ यांची मुलगी नैना आणि कुणालचे लग्न 2015 मध्ये झाले.
5 / 8
कुणाल खेमू हा प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जावई आहे. त्याने त्यांची मुलगी सोहा अली खानसोबत 2014 मध्ये लग्न केले.
6 / 8
थ्री इडियट्स या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी हा प्रेम चोप्रा यांचा जावई आहे. त्याचे लग्न प्रेरणा चोप्रासोबत 2000 साली झाले आहे.
7 / 8
धनुष हा सुपरस्टार रजनिकांत यांचा जावई आहे. त्याने रजनिकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत 2004 मध्ये लग्न केले.
8 / 8
फरदीन खानचे लग्न नताशा सोबत झाले आहे. नताशा अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे.
टॅग्स :अजय देवगणअक्षय कुमार