Join us

अभिनेता इमरान हाश्मी पडला आजारी, सर्व शूटिंग केल्या रद्द, वाचा काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:52 IST

1 / 8
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी सध्या प्रकृतीच्या कारणाने चर्चेत आहे.
2 / 8
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अचानक इमरान हाश्मीची तब्येत बिघडली. त्याला डेंग्यू (Emraan Hashmi Diagnosed With Dengue) झाल्याचे समोर आले आहे.
3 / 8
अभिनेत्याची अचानक तब्येत बिघडली असल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबण्यात आलं.
4 / 8
इमरान हाश्मी मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये सिनेमाचं शूटिंग करत होता.
5 / 8
बॉलिवूड हंगामानुसार, डॉक्टरांनी अभिनेत्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यानं शुटिंगपासून ब्रेक घेतलाय.
6 / 8
इमरान हाश्मीनं एका आठवड्यासाठी ब्रेक घेतल्याची माहिती आहे. त्याची तब्येत बरी झाल्यानंतर पुन्हा सिनेमाचं शुटिंग सुरू होईल.
7 / 8
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, इमरान हाश्मी हा एका गँगस्टर अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटातप्रसिद्ध दक्षिण अभिनेता पवन कल्याणसोबत दिसणार आहे.
8 / 8
याशिवाय इमरानकडे 'आवारापन' चित्रपटाचा सिक्वेल 'आवारापन २' देखील आहे. तर तो शेवटचा 'ग्राउंड झिरो' चित्रपटात दिसला होता
टॅग्स :इमरान हाश्मीडेंग्यू