ग्लॅमरच्या दुनियेत स्वत:चे नाव, फॅन फॉलोर्इंग, गॉसिप्स निर्माण करायचे म्हटल्यास हार्डवर्क तर करावेच लागते. जो जास्त मेहनत घेतो त्याला त्या मेहनतीचे फळही मिळतच असते, नाही का? ‘वर्क हार्ड, पार्टी हार्डर!’ हा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचा जणूकाही मंत्रच आहे. सेलिब्रिटींना तर पार्टी करायचे केवळ निमित्त हवे असते. मग बर्थडे पार्टी, सक्सेस पार्टी, अॅवॉर्ड नाईटस याठिकाणी ते फ्रेंड्स आणि फॅमिली यांच्यासोबत फुल्ल टू धम्माल-मस्ती करत असतात. यापैकी ‘बी-टाऊन’चे काही सेलिब्रिटी असे आहेत की, जे पार्टीसाठी काहीही करू शकतात. घेऊयात अशाच काही ‘पार्टी अॅनिमल्स’चा आढावा...
करण जोहर
बॉलिवूडचा रोमँटिक दिग्दर्शक करण जोहर हा या पार्टी अॅनिमल्सचा जणूकाही लीडरच आहे. इंडस्ट्रीतीतल ‘ए’ लिस्टर्स सेलिब्रिटींना पार्टी द्यायला करणला प्रचंड आवडतं. अलीकडेच त्याने त्याला जुळी मुले रूही आणि यश झाल्यावर त्याच्या रेसिडेन्सलाा लॅविश पार्टी दिली होती.
करिना कपूर खान
‘द बेगम आॅफ पतौडी’ हिला आपण ‘क्वीन आॅफ पार्टींग’ असे म्हणू शकतो. ती सोशल मीडियावर जरी अॅक्टिव्ह नसली तरीही ती पार्ट्या, सोशल गॅदरिंग करण्यात पुढे आहे. मलायका अरोरा, अमृता अरोरा, बहीण करिश्मा कपूर यांच्यासोबत ती जास्तीत जास्त पार्टी करताना दिसते. बेबो करण जोहर आणि मनिष मल्होत्रा यांच्या देखील खूप जवळची आहे.
रणवीर सिंग
बॉलिवूडचा एकमेव अभिनेता असा आहे की, जो केव्हाही पार्टीच्याच मुडमध्ये असतो. आता तुम्ही म्हणाल कसे? तर त्याला कोणत्याही अॅवॉर्ड फंक्शनला बघा, तो एकदम मस्तीच्या मूडमध्ये असतो. त्याच्याजवळ आलेल्या प्रत्येक फॅन्ससोबत तो फोटो काढतो, सेल्फी काढतो. तसेच सेलिब्रिटींसोबतही तो कूल असतो. त्याची गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण फार क्वचित त्याच्यासोबत पार्टी करताना दिसते.
आलिया भट्ट
आलिया भट्टने दिग्दर्शक करण जोहरसोबत बरेच चित्रपट साकारले आहेत. त्यामुळे त्याचे काही गुण तिच्यामध्ये आले आहेत. विशेषत्वाने ते क्रेझी पार्टींचे. आता ती देखील बऱ्याचदा पॅपराझीला पार्टी करताना दिसते. ती तिची बहीण शाहीन भट्ट हिच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
बिपाशा बासु
बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीत बिपाशा बासु दिसत नाही. मात्र ती बऱ्याचदा तिचा पती करणसिंग ग्रोव्हर याच्यासोबत किंवा तिच्या काही खास फ्रेंड सर्कलसोबत पार्टी करताना दिसली आहे. लाँचेस, प्रमोशन, डिनर पार्टी यावेळी ती आवर्जून फ्रेंडससोबत दिसते.
सोनम कपूर
स्टारकिड असल्यामुळे मस्सकली गर्ल सोनम कपूरला पार्ट्यांची आवड लहानपणापासूनच आहे. ती नेहमी लॅव्हिश पार्ट्यांमध्ये दिसून आली आहे. बॉलिवूड पार्ट्यांशिवाय ती गेट टूगेदर आणि सक्सेस पार्ट्यांमध्ये दिसून आली आहे. फॅशन शोज, पार्टीज, नॅशनल, इंटरनॅशनल या पॅरिस आणि कान्स याठिकाणी ती पार्टींसाठी जात असते.