फरहान अख्तर व शिबानी दांडेकरच्या लग्नाची होतेय चर्चा, पाहा त्यांचे Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:07 IST
1 / 9अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. तर यावर्षी फरहान व शिबानी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. 2 / 9फरहान व शिबानी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. 3 / 9 गत सप्टेंबरपासून फरहान व शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. खुद्द शिबानीने फरहानसोबतचा लंडनच्या रस्त्यावरचा फोटो शेअर करत या चचेर्ला तोंड फोडले होते. 4 / 9आता हे दोघे लग्न कधी करतायेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.5 / 9फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे. होय, शिबानी नुकतीच फरहानची मुलांसोबत वेळ घालवताना दिसली. 6 / 9फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्यानं पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. 7 / 9 त्या दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या असून यावर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये ते लग्नबेडीत अडकू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र अद्याप या गोष्टीला त्यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही.8 / 9फरहानच्या मुलांनादेखील शिबानी आवडते. त्यामुळे ते दोघेही नक्कीच पुढचा विचार करतील.9 / 9फरहान ‘द स्काज इज पिंक’ या चित्रपटात दिसणार असून सध्या तो या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.