Join us  

नादखुळा पंजाबी मुंडा! कंगनाने विचारले दिलजीत कित्थे आ? गायकाने दिलं असं उत्तर की, पोटधरून हसत बसाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 11:50 AM

1 / 8
कंगना रणौतने शुक्रवारी तिच्या ट्विटर हॅंडलवरून प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांजवर निशाणा साधला होता. याचं कारण हे होतं की, दोघेही शेतकरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सपोर्टमध्ये आहेत. आपल्या अनेक ट्विट्समध्ये कंगनाने हॅशटॅग वापरला होता दिलजीत कित्थे आ(दिलजीत कुठे आहेस?). आता दिलजीतने यावर कंगनाला मजेदार उत्तर दिलंय.
2 / 8
कंगनाने लिहिले होते की हैद्राबादमध्ये १२ तासांची शिफ्ट केल्यानंतर आजा सायंकाळी चेन्नईमध्ये चॅरिटी इव्हेंट अटेंड करायला आले. मी पिवळ्या रंगात कशी दिसतेय. सोबतच दिलजीत कित्थे आ? प्रत्येकजण त्याला ट्विटरवर शोधत आहेत.
3 / 8
आणखी एका ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, मी पुन्हा एकदा म्हणत आहे की, मी बरोबर होते. जर असा विचार केला की, हे प्रकरण कोर्टात असतं तर मी ऑफिशिअली जिंकले असते. तेव्हा चिल्लर पार्टी पुढील वेळी मला शिव्या देणे, त्रास देणे, खिल्ली उडवणे किंवा टार्गेट करण्याआधी हे लक्षात ठेवा की, मी साऱ्या बापांची आई आहे #Diljit_Kitthe_aa
4 / 8
कंगनाच्या या ट्विटनंतर सगळेच दिलजीतच्या उत्तराची वाट बघत होते. त्याला थोडा उशीर लागला पण मजेदार उत्तर दिलं. दिलजीतने लिहिले की, सकाळी उठून जिमला गेलो, मग दिवसभर काम केलं, आता मी झोपायला जात आहे. हे घे वाच माझं शेड्यूल. हॅशटॅग - मेरा शेड्यूल, आजा, आजा.
5 / 8
कंगनाने सोशल मीडियावर एका यूजरची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये एका व्यक्तीने कथितपणे सोप्या शब्दात कृषी विधेयक समजावून सांगितलं आहे. त्याने हे दाखवलं की, अखेर मतेभद कोणत्या मुद्द्यांवर होत आहेत.
6 / 8
हीच पोस्ट शेअर करत कंगना रणौतने दिलजीतवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, पाजी तुमचे धन्यवाद. आता या लोकल क्रांतिकारी दिलजीतला सुद्धा कुणीतरी हे समजावून सांगा.
7 / 8
कंगना पुढे म्हणाली की, दिलजीत माझ्यावर तर फार नाराज झाला होता. तेव्हा मी समजावण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे.
8 / 8
दरम्यान जी कंगना आता दिलजीतला हे कृषी विधेयक पंजाबीमध्ये समवाजून सांगण्यास सांगत आहे. काही दिवसांपूर्वी दिलजीतचा असाच एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात त्याने कंगनाला टोला मारत म्हटले होते की, मी हिंदीत बोलत आहे जेणेकरून सर्वांना समजेल.
टॅग्स :दिलजीत दोसांझकंगना राणौतबॉलिवूडसोशल मीडिया