Join us  

लिसा हेडनच्या गोंडस बाळाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 7:30 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री लिजा हेडनच्या घरी नवीन पाहुणा दाखल झाला आहे. ती दुसऱ्यांदा आई बनली आहे. लिजाने मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव लिओ ठेवले आहे.
2 / 6
लिजाने आपल्या दोन्ही मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ते दोघे एकमेकांकडे पाहत आहेत आणि एकमेकांचा हात पकडलेला आहे.
3 / 6
मागील वर्षी ऑगस्टमध्ये लिजा हेडने एक फोटो शेअर केला होता आणि सांगितले होते की तिच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. या फोटोत लिजा तिचा नवरा डिनो लालवानी आणि मुलासोबत दिसत होती. तिघे पाण्यात उभे होते.
4 / 6
बॉलिवूडमध्ये लिजाने आयशा चित्रपटातून पदार्पण केले होते.
5 / 6
लिजाने हाऊसफुल ३, द शौकिन्स, क्वीन आणि ए दिल है मुश्कील यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
6 / 6
लिजा हेडन किंगफिशर गर्ल बनली होती. याशिवाय ती बऱ्याच मासिकाच्या कव्हरपेजवर झळकली आहे. तिने प्रेग्नन्सीच्या काळात तिचे अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
टॅग्स :लीसा हेडन