Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:53 IST
1 / 9अभिनेत्री दीया मिर्झाने सीरीज काफिरमध्ये एक सीन शूट करताना तिची नेमकी काय अवस्था झाली होती याबद्दल सांगितलं आहे. तिच्यासाठी तो सीन करणं खूप अवघड झालं होतं. 2 / 9दीयाने न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार, 'एक रेप सीन होता. तो केल्यानंतर मला उलटी झाली. मला आठवतंय जेव्हा आम्ही रेप सीन शूट केला तेव्हा ते करणं कठीण होतं.' 3 / 9'तो सीन शूट करताना मी थरथरत होती. पूर्ण सीक्वेन्सनंतर मला उलटी झाली. इमोशनली आणि फिजिकली परिस्थिती अत्यंत अवघड होती.' 4 / 9'जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला त्या सीनमध्ये घेऊन जाता. ते अनुभवण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरंच भयंकर अनुभव होता' असं दीयाने म्हटलं आहे. 5 / 9काफिरमध्ये अभिनेत्रीने पाकिस्तानी महिलेची भुमिका साकारली आहे. जी चुकून भारतीय सीमेजवळ पोहोचते आणि तिला नंतर दहशतवादी समजलं जातं. 6 / 9दीयाच्या या सीरीजचं भरभरून कौतुक करण्यात आलं. सहा वर्षांनंतर काफिर री-एडीट करून चित्रपटाच्या रुपात रिलीज केला जाणार आहे. 7 / 9खऱ्या आयुष्यात आई होण्याआधी तिने काफिरमध्ये आईची भूमिका साकारली होती. तेव्हा तिच्यात मातृत्वाची भावना जागी झाली असं दीयाने म्हटलं आहे. 8 / 9दीयाला एक गोंडस मुलगा आहे. दीया सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत. 9 / 9