Dhurandhar: ४० वर्षांच्या रणवीरसोबत 'धुरंधर'मध्ये रोमान्स करणार २० वर्षांची सारा; कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:58 IST
1 / 8ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर' सिनेमात रणवीरचा खुंखार लूक पाहायला मिळणार आहे. 2 / 8या अॅक्शन पॅक सिनेमात रणवीर रोमान्सही करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ४० वर्षांचा रणवीर सिंग त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार आहे. 3 / 8'धुरंधर'च्या ट्रेलरमध्येही रणवीरच्या रोमान्सची झलक दिसते. रणवीरसोबत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव सारा अर्जुन असं आहे. 4 / 8सारा अर्जुन ही २० वर्षांची आहे. २००५ मध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडील राज अर्जुन हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. 5 / 8साराने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. तिने अनेक बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्येही काम केलं आहे. 6 / 8साराने पोन्नियिन सेलवन या सिनेमात ऐश्वर्या रायच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 7 / 8२० वर्षांची सारा अर्जून ही १० कोटींची मालकीण आहे. पण, सारा सोशल मीडियावर फार सक्रिय असल्याचं दिसत नाही. 8 / 8'धुरंधर' सिनेमाच्या ट्रेलरमुळे सारा चर्चेत आली आहे. या सिनेमात ती रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.